एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर

0
एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर

पिंपरी-चिंचवड शहरात विशेषत: औद्यागीक क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

पिंपरी येथील एसकेएफ कंपनीचे कर्मचारी योगेश मोहन भोसले यांनी कर्मचारी म्हणून कंपनीने दिलेले क्रेडिट कार्डचे माध्यमातून सुमारे ४८ लाख रू खात्यातून काढले व ते स्वत: साठी वापरले, सदरची रक्कम खात्यात भरू न शकल्याने पदाचा व कार्डचा गैरवापर केला म्हणून रोहन फडके यांनी चिंचवड पो.ठाणे येथे फसवणुकीचा तकार दिली.
सदर प्रकरणी आरोपीस २/१२/२०२२ रोजी अटक करण्यात आली, सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल झाले.
सदर आरोपीचा यापुर्वी दोषारोप पत्र दाखल होण्यापूर्वी व दाखल झालेनंतर तसेच पुणे जिल्हा न्यायालयाने जामीन नामंजूर केले आहेत.


सदर कामी अॅड विकास बा.पाटील-शिरगांवकर हे १४/४-२०२३ रोजी पिंपरी न्यायालयात हजर झाले, खटल्याची सुनावणी सुरू झाली. सदरकामी सरकार पक्षाने तीन साक्षीदार तपासले असून त्यांचा उलटतपासही पुर्ण झाला. सदरकामी ॲड विकास पाटील शिरगांवकर यांनी आरोपीस अटक करताना फौ प्रं स. कलम ४१-ब चा भंग झाला आहे सबब आरोपीस जामीन द्यावा हा महत्वाचा मुद्दा तसेच आरोपीचे आजारपण, मुलीची शाळा, इ मुद्दे उपस्थित केले. सदरकामी बचाव पक्षाचा, सरकारी वकील, कंपनीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून मे. न्यायालयाने आरोपीस
दि २२/५/२३ रोजी जामीनावर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत.


सदरकामी तपासी अधिकारी यांनी दि २२/५/२०२३ रोजी कागदपत्र हजर करणेसाठी मुदत मागीतली आहे व त्यानंतर पुढील साक्ष होणार आहे.


सदरकाम दि २९/५/२०२३ रोजी नेमले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात विशेषत: औद्यागीक क्षेत्रात या निकालाची मोठी चर्चा चालू आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.