माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो : शरद पवार

0
माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो : शरद पवार

‘माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो’ : शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, माझ्या अंगावरून एक साप सरपटत गेला. या प्रकारमुळे मी सुन्न झालो. यानंतर मी दत्तात्रय वळसे-पाटील(दिलीप वळसे पाटीच यांचे वडील) यांना बोलावले. ते आनंदी होत म्हणाले, हा तर शुभ शकुन आहे. आपण पहाटे पूजा करूयात! त्यांचा सल्ला ऐकून मी पूजा केली. नंतर आम्ही दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या की मी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठच दिवसांत मी मुख्यमंत्री झालो.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी हा किस्सा ऐकविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप-वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. पवार म्हणाले, दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील यांच्यासोबत एकदा भीमाशंकरला गेलो होतो. तेव्हा मी राज्याचा उद्योगमंत्री होतो. एका खोलीत आमची राहण्याची सोय होती. रात्री एकच्या सुमारास मला थोडी हालचाल जाणवली म्हणून उठून बसलो तर माझ्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला. या प्रकारामुळे मी सुन्न झालो आणि दत्तात्रय पाटील यांना हाक मारली.

दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो शुभशकुन मी त्यावेळी अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते. पण मला काही फारसे जाने होत नाही.

Source: Maharashtra Today

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

पंतप्रधान शरद पवार? दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा

लोकनेते शरद पवार आले धावून

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.