जगातील सर्वात उष्ण वाळवंट झाला बर्फाळ
अनेक देशांमध्ये तापमान -50 डिग्री सेल्सियसच्या खाली गेले आहे. जगभरात थंडीचा प्रकोप सुरू असताना, यावर्षी थंडीमुळे जगातील सर्वात मोठे तसेच उष्ण असे सहारा वाळवंट सुद्ध बर्फाळ झाले आहे. इथे 18 इंच जाड अशी बर्फाची चादर या वाळवंटात पसरली आहे.
येथील वाळूच्या डोंगरांवर बर्फ पडत असल्याने सगळेच हैराण झाले आहेत. सहारा वाळवंटामध्ये बर्फ पडण्याची 40 वर्षांतील ही दुसरी घटना आहे.
गेल्या 37 वर्षात या ठिकाणी बर्फवृष्टी झालेली नाही. बर्फ पडण्याची ही प्रक्रिया अजुनही सुरूच आहे.
आता या भागात 18 इंच जाड अशी बर्फाची चादर पसरली आहे.
जगातील सर्वात उष्ण वाळवंट म्हणून प्रसिद्ध व हा दुष्काळी भाग असला तरीही 15 हजार वर्षात तो पुन्हा हिरवागार होईल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फॉलो करा.