सरकार सोशल मीडियावर निर्बंध आणण्याच्या तयारीत, आपत्कालीन स्थितीत राहणार बंद?

0
सरकार सोशल मीडियावर निर्बंध आणण्याच्या तयारीत, आपत्कालीन स्थितीत राहणार बंद?

आपत्कालीन परिस्थितीत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर निर्बंध करण्याचा विचार सरकार करत आहे.

सोशल मीडियावर निर्बंध

आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन अफवा पसरवून तणाव वाढवला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने यावर उपाय म्हणून सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत तयारी सुरु केली आहे. सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून याबाबत सल्ला मागितला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका पोहचेल अशा घटना घडत असताना तात्पुरत्या काळासाठी सोशल मीडियावर नियंत्रण ठेवत बंद ठेवायचे असा प्रस्ताव सरकार तयार करत आहे.

इंटरनेट सुरू ठेऊन फक्त सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी आणण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. इंटरनेट बंद केल्याने सर्व सोयीसुविधा ठप्प पडत असल्याने तात्पुरते सोशल मीडियावर बंदी आणल्याने अफवांवर नियंत्रण मिळेल असा सरकारला विश्वास आहे.

गेल्या काही दिवसातील घटना पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना ऊत आलेला पाहायला मिळतो. मुलांना पळवणारी टोळी तुमच्या भागात आली आहे यावरून असो किंवा धार्मिक भावना दुखावण्यावरून अनेकांना आपला जीव गमवावा लागला अशा घटना असो.

या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे, यावर आपणांस काय वाटते? आम्हास नक्की कळवा….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Top 10 Digital Marketing Courses in Pune with 100% Placement Assistance

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

मराठीतील डिजिटल क्रांती

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.