नगरसेवक सोडून गेल्यावर सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली

0
नगरसेवक सोडून गेल्यावर सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली

शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतील आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना गळाला लावलं आहे.

त्यानंतर सोशल मीडियावर या मुद्द्यावरून अनेक जण आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. अनेकांनी शिवसेनेनं उचलेल्या या पावलावर टिका केली आहे.

तर, बऱ्याच जणांनी राज ठाकरेंनी आता तरी पक्ष संघटनेबाबत विचार करण्याची वेळ आल्याचं मत व्यक्त केलं आहे.

तर, काहींनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढण्यावर लक्ष केंद्रीत केलं मात्र पक्षात काय चाललं आहे, याकडे लक्ष दिलं नाही, असं म्हटलं आहे.

फेसबुक, ट्विटर यांवर अनेकांनी आपापली मत नोंदवत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेबाबत आपापली भूमिका मांडली आहे.

ट्विटर वर त्यांच्या समर्थनार्थ तसेच खिल्ली उडवण्यात सुद्धा सर्व अग्रेसर होते.

सोशल मीडियावर कायम संमिश्र प्रतिक्रिया येतच असतात. त्यातल्या ह्या काही….

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.