खरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती | अजिंक्य भोसले

0
खरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती | अजिंक्य भोसले

खरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती

त्याच्या स्टंटमूळ त्याचा जीव गेला. उगीच दिखाउपणात तिचा जीव गेला. खरतर तो हिरो नाही तरी तो हिरो आहे कारण त्याच्यामुळे हे असले बनावटी कलाकार हिरो जगतात आरामात. पण तरीही तो उपेक्षित आहे समाजाच्या प्रेमासाठी. त्यान केलेल्या कामाची तारीफ क्वचितच आपण करतो. तारीफ करतो, गोडवे गातो आणि पुन्हा म्हणतो तसला जन्म खरच वाईट. आपल्या क्षुल्लक जन्माला आपण खूप नशीबवान समजतो. त्याच्या आयुष्यासाठी जिवंतपणीच आपण त्याला श्रद्धांजली वाहतो. ती असते थाटात जगत. प्रत्येक क्षणाला रंगवलेल्या तोंडाला आरशासमोर बघत. लोक हि तिच्या चेहऱ्यावर जणू अस काही भाळतात कि गल्लीतल्या बाईला-मुलीला बघताना ह्या लोकांची नजर छातीच्यावर कधी जात नाही. पण अशा दिखाऊ “तिला” मात्र बघताना चेहऱ्यावरून ह्यांची नजर खाली जात नाही.

तो जगत असलेल्या आयुष्याला आपण जवळून बघायची तसदी हि घेत नाही तिथे ती जे जे काही करते त्याच अनुकरण करण्यात आपली ताकद पैसा वेळ घालवणारी माणसाची जात मानसिकता बदलेली कधी हे माहित नाही. तरी तो बिचारा कधी मेला तर गावोगावी त्याची मरणाची बातमी जग जिंकल्यासारखी पसरवली जाते. पण ती गेली तर? प्रत्येक घराघरात तिच्या जाण्याचे शोक व्यक्त होतात. त्याच्या मृतदेहाला शहीद म्हणून समजतात. पण तिच्या मृतदेहाला अमर पवित्र आत्मा मानतात. त्याच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराला फक्त त्या एका गावाची हजेरी असते. आणि तिच्या पार्थिवाला जागेवर आणे पर्यंत सारा देश शोकाकुल होऊन बसलेला दिसतो.

खरे स्टंट करून देशाला वाचवणारा तो- सैनिक आहे ज्याची दखल तो मेल्यावर घेतली जाते तिपण एक दिवस पेपर मध्ये बातमी देऊन. आणि,

उगीचच दिखाऊपणा करून लोकांच मन जिंकणारी ती– अभिनेत्री आहे जी जिवंतपणी आणि मेल्यावर ही तिच्या प्रत्येक क्षणाची दखल घेतली जाते.

विचार करा. तिच्या मृत्यूने हे जग नाही थांबल. पण त्याच्या एका मृत्यूने दहा जण इथे घुसून आपली हजारो मारून टाकू शकतात…… विचार करण्याची गोष्ट आहे

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी |

पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला

नोकरी म्हणजे एक मरतुकडी गाय…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.