भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने धोनीला आंतरराष्ट्रीय T20 सामन्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा सल्ला दिला आहे.
नुकताच भारताचे माजी क्रिकेटपट्टू अजित आगरकर आणि VVS लक्ष्मण यांनी सुद्धा धोनीला ट्वेंटी-20 मध्ये खेळायचा विचार करावा असे म्हणले होते.
धोनीकडे अचाट कौशल्य असून त्याने या खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघावे असा सल्लाच गांगुलीने त्याला दिला आहे.
भारताने न्युझीलॅन्ड विरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात ४ बाद ९७ वरून १९७ धावांचा शिखर गाठताना अपयश आले होते. धोनीवर त्या सामन्यानंतर टीकाही झाली होती.
धोनी आणखी बरीच वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळू शकतो, असे गांगुलीने सांगितले. तो म्हणाला, ‘‘धोनीने एकदिवसीय क्रिकेट खेळत राहिले पाहिजे. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेट अधिक मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. मात्र ते निवड समितीवर आणि त्यांना तो कसा खेळावा हे अपेक्षित आहे, यावर अवलंबून आहे.’’
आणि यावर धोनी खलीज टाईम ला बोलताना म्हणाला “सर्वांचे वयक्तिक मत असते व त्याचा आपण आदर केला पाहिजे. ”
भारतीय संघ श्रीलंके सोबत होणाऱ्या ३ कसोटी सामन्यांची तयारी करत आहे. हा सामना १६ तारखेला इडन गार्डन कोलकाता ला होईल.