होय मि तुमची लालपरी: एस टी बोलतेय…

0
होय मि तुमची लालपरी: एस टी बोलतेय…

होय मि तुमची लालपरी – एस टी बोलतेय…..?

होय मि एस टी बोलतेय…सह्याद्रीच्या कड्याकपारीत तुमच्या सेवेत भेधडक पणे फिरनारी तुमची सर्वांची लाडकी एस टी बोलतेय. खरंच बर वाटतं जेव्हा काहीजण प्रेमाने का होईना मला लालपरी बोलतात.निर्जीव असली तरी एका आपल्या कुठूंबांतील हक्काच्या व्यक्तीसारखा माझ्यावर हक्क दाखवतात.पण कधी कधी माझा हा आनंद क्षणभंगुर ठरतो ओ….

हा आनंद क्षणभंगुर का ? तर ऐका सांगते…. जेव्हा मोठ मोठे संप पुकारले जातात, निषेधार्थ मोठे बंद ऐलान केले जातात,जातीय दंगली घडवल्या जातात त्यावेळी मानवाचा राग माझ्यावरच निघतो ओ.तुमचा क्षणिक निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्यावरच दगडफेक केली जाते ,माझीच तोडफोड केली जाते, माझीच जाळपोळ केली जाते…का ? कशासाठी मि माझ्या कार्यात कधीच कमी पडत नाही..तरीही तुमचा राग माझ्यावरच का निघतो ? हे सर्व तुम्हीच घडवता & तुम्हीच माझ्यावर अशा प्रकारे राग व्यक्त करता.माझ्यात मनमुराद प्रवास करा फक्त माझी नासधुस करू नका

बर वाटतं मला जेव्हा माझी आतुरतेने वाट बघत प्रवाशी बस थांब्यावर उभे असतात.उज्वल भविष्याचे विद्यार्थी सवलतीच्या दरात माझ्यातुन प्रवास करतात.कोणाला तरी आपल्या गावाला, आपल्या गोतावळ्यात, आपल्या पाहुण्यांच्यात पोहचवल्यावर जो आनंद असतो तो शब्दात न व्यक्त होणारा असतो.माझं ब्रीदवाक्य तर तुम्हाला माहीतच आहेना “प्रवाश्यांच्या सेवेसाठी” अशीच कायम तुमची सेवा मि अस्तित्व असे पर्यंत करेन

पण खरंच बरकां मानवाची वृत्तीच जरा आता बिघडलीय आपल्या फायद्यासाठी बनवलेल्या वस्तुच तो स्वताच्या भावनात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी संपवु लागलाय….

लेखक – प्रेम शंकरराव भोसले

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पतंगराव कदम माहिती, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सहकार क्षेत्र कार्य, पुरस्कार, Patangrao Kadam Biography

Funny Women’s Day Wishes and Thoughtful Wishes on Twitter Made My Day | Marathi

उन्हापासून संरक्षण तब्येतीला जपण्यासाठी १६ उपाय

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.