स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन आयोजित तिन दिवसीय प्रॉपर्टी व बॅंकिंग प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन आयोजित तिन दिवसीय प्रॉपर्टी व बॅंकिंग प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे आयोजित केलेल्या तिन दिवसीय प्रॉपर्टी व बॅंकिंगच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक विजय फुगे, फॉर्च्यून ग्रूपचे संचालक मकरंद पांडे, बांधकाम व्यावसायिक नितीन धिमधिमे, राजेश अगरवाल, राजेश मेहता , दिनेश जाहंगीरदार, नितीन सोमाणी,दत्तात्रय जाधन, आदी उपस्थित होते.

हे प्रदर्शन भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर 26 ते 28 जानेवारी रोजी भरवण्यात आले होते या प्रदर्शनात वाकड, पुणावळे,मोशी,चिखली, चर्होली,आऴंदी,चाकण,वाई, महाबळेश्र्वर,पाचगणी, मावळ येथील चाळीस पेक्षा जास्त प्राँपटी संस्थांनी यात सहभाग घेतला होता.

यावेळी आमदार म्हणाले कि, प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच छताखाली नामांकित व दर्जेदार गृहप्रकल्प पाहण्यास मिळते. अशी प्रदर्शने शहरात वारंवार भरवली पाहिजेत. या तीन दिवसीय प्रदर्शनात 26 सदनिकांची जाग्यावरच विक्री झाली असून 132 सदनिकाची विक्री ही अंतिम टप्प्यात असल्याचे येथील सहभागी झालेल्या अनेक ग्रहप्रकल्पाच्या संचालकानी सांगितले.

तर प्रथमच असा प्रतिसाद अशा प्रदर्शनातून आम्हाला मिळाला असल्याचे फॉर्च्यून ग्रूपचे संचालक मकरंद पांडे यांनी बोलताना सांगितले.

या प्रदर्शनात फ्लँट व प्लाँट बुकींगवर ग्राहकांना सोने,सिंगापूर टुर तर महिन्द्रा कल्ब तर्फै तीन दिवसाच्या मोफत भारतातील सहल अशा विविध प्रकारची आकर्षक बक्षीसे ही आयोजकांच्या वतीने देण्यात आली होती.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिवानंद लांडगे,सुशांत साळुंखे, अविनाश आदक, प्रभाकर हिंगे,विशाल घोडेस्वार, बंदेनवाज चौधरी आदीनी परिश्रम घेतले.

आपले घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार… आम्हाला आपल्या स्वप्नांबद्दल नक्की सांगा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.