स्टिफन हॉकिंग: एका तत्व चिंतकाचा शेवट…
Stephen Hawking in Marathi
स्टिफन हॉकिंग…..
आधुनिक ऋषी म्हणता येईल अस व्यक्तिमत्व. आज सकाळी स्टिफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
आज १४ मार्च आहे. आजचा दिवस आणखी दोन दृष्टीनी महत्वाचा आहे.
आजचा दिवस अल्बर्ट आइंस्टाईन या जगदविख्यात चिंतकाचा जन्मदिवस आहे. त्यानी मांडलेली ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ ही सामान्य माणसाच्या अवाक्याच्या बाहेर असली तरीही विश्वाच्या अभ्यासाच्या संदर्भात अनेक गोष्टींचा उलगडा करणारी आहे, त्यावर वैज्ञानिक भाष्य करणारी आहे. त्याच्या गणिती सिद्धता देणारी आहे.
आजची तारिख अमेरिकन पद्धती प्रमाणे 3.14 अशी लिहिली जाते. ही Pi या गणिती स्थिरांकाची किंमत आहे. हा स्थिरांक विज्ञान आणि गणितात अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आज Pi Day साजरा केला आहे.
आणि आजचाच दिवशी स्टिफन हॉकिंग या एका थोर ‘थिओरेटिकल फिजिसिस्ट’चा शेवटचा दिवस ठरला.
सामान्य माणसाला ‘ब्लॅक होल’ या संकल्पनेची ओळख करून देणार्या स्टिफन हॉकिंग यांचा ‘विश्वनिर्मिती संबंधी मुलभूत प्रश्न आणि या विश्वात आपले अस्तित्व’ हा चिंतनाचा विषय होता. या संबंधात त्यानी विपुल लेखन करताना ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’, ‘द ग्रॅन्ड डिझाईन’, ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’, अशासारखी अनेक उत्तम पुस्तके लिहिली.
हॉकिंग याना लाखात एकाला होणारा Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) हा आजार फार लवकरच्या वयात जडला होता. या आजारात हळुहळु एकेक अवयव निकामी होत जातो. गेले अनेक दशके ते या आजारामुळे व्हिल चेअरला जखडलेल्या अवस्थेत होते. ही व्हिल चेअर विशेष सोयिनी युक्त अशी होती. त्यांच्या एका गालाचा स्नायू हलु शकत असे. त्या हालचाली टिपणारे यंत्र एका संगणकाशी जोडण्यात आलेले होते. त्या हालचाली थेट शब्दात रुपांतरीत केल्या जाण्याची सोय त्यात होती.
त्यांच्या तत्वचिंतनाला हा त्रिवार सलाम.
लेखक: राम जोशी
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.