फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद पी छाब्रिया ऊर्फ PP यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास….
SUCCESS STORY OF PRALHAD P CHHABRIA, FINOLEX INDUSTRIES
उद्योगपती असेच होता येत नाही. माणुस पण असाच मोठा होत नसतो.
१० रु. नोकरी ते १० हजार कोटीं ची उलाढाल.
फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया (Pralhad P Chhabria) ऊर्फ PP यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास. ३५ वर्षा पूर्वी कोणाला स्वप्नात पण वाटल नसेल की हा मुलगा १ दिवस उद्योग क्षेत्रा मधे आपले वर्चस्व निर्माण करुण फाइबर इंडस्ट्री वर राज्य करेल पण हे शक्य झाल मेहनत चिकाटी आणी प्रयत्नवादा मुळे.
PRALHAD P CHHABRIA, FINOLEX INDUSTRIES LTD
Pralhad P Chhabria हे मुळ चे पाकिस्तान च्या सिंध प्रांतातले, त्यांचे वडिल परशराम छाब्रिया हे तेथील प्रसिद्ध कापड व्यापारी, पण १९४२ साली वडिलांच आकस्मित निधन झाले. आई, ५ बहिणी व ५ भाऊ असे हे कुटुंब उघड्या वर आले. त्या वेळी प्रल्हाद छाब्रिया (Pralhad P Chhabria) एका दूरच्या नातेवाईकाचा धागा पकडून पुण्यात आले. त्यावेळी त्यांच वय होत अवघे १२ वर्ष व शिक्षण तेही दुसरी झालेल, शिक्षण नसल्यामुळे कोणी नोकरी देत नव्हते. शेवटी एका ठिकाणी त्याना सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली.
१६ ते १८ तास काम करून दर महिना ते आपल्या आईला ३० रु पाठवत होते. १९४५ साली फाळणी च्या झळा बसु लागल्यामुळे छाब्रिया कुटुंबीय पुण्यामधे आले होते. नारायण पेठेत २ रूम मिळाल्या. त्यानंतर छाब्रिया बंधुनी मुंबई हुन कापड आणुन कापड विक्रिचा व्यवसाय चालु केला. त्या मधे पण कसे तरी ५ रू मिळायचे. त्या नंतर इलेक्ट्रोनिक्स च्या वस्तु विकु लागले, सरकारी निविदा भरणे चालूच होत.
परिस्थिति पण खुप बिकटच होती, कधी जेवन मिळत होत तर कधी पाणी पिउन भुक मिटवावी लागत होती.
प्रयत्न मात्र चालुच होते. त्यातच देहु कँटोमेंट बोर्डा ची बेडिंग वायर ची निविदा निघाली आणी तोच छाब्रियां साठी टर्निंग पॉइंट ठरला हे काम छाब्रियां ना मिळाल व १० बाय १० च्या खोलीतून फिनोलेक्स (Finolex Industries) चा प्रवास सुरु झाला तो आज पर्यन्त कधी थांबला च नाही एका छोट्याश्या खोलीतुन सुरु झालेली ह्या कंपनीचे आज सगळ्या भारतभर जाळे पसरले आहे. पुणे, रत्नागिरी, शिरवळ, गोवा, उत्तराखंड अश्या ५ कंपनी व ११ कारखाने असा हा फिनोलेक्सचा पसारा वाढला आहे. २ री नंतर शाळेत ही न जाऊ शकणारे छाब्रिया हे उद्योगपति झाले फ़क्त आणी फ़क्त कष्ट आणी प्रयत्नावरती.
हार कधी या माणसाने मानलीच नाही असंख्य संकटे आली पण कधी मागे सरकला नाही तेही पाठिशी कोणीसुद्धा नसताना. आजच्या काळा मधे आमचा इंजीनियर इतक्या लवकर हारला की तो आज स्वताची इज्जत स्वतःच सोशल मीडिया वर काढत आहे. हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
उत्तुंग शिखरावर चढत असतानासुद्धा छाब्रिया कुटुंबाचे पाय हे सदैव जमीनीवरच राहिले. सगळा उद्योग व्यवस्थित चालु झाला होता कश्याचिही कमतरता नव्हती तरीसुद्धा छाब्रीयांच्या ५ ही जनांची मुल सकाळी लवकर कंपनी मधे येउन कचरा काढण्या पासुन ते केबल तयार करण्या पर्यंतचे काम न लाजता स्वतः इतर कामगार लोकांबरोबर करायची. गुणवत्ता आणि दर्जाच्या जोरावर वायर आणि PVC वर एकहाती राज्य केले.
१२ ला कंपनी च्याच कैंटीन मधे जेवण करुण ही पिंपरी मधुन लोकलने पुण्याला वाडिया कॉलेज ला शिक्षणासाठी जायची, कॉलेज सुटलं की परत कंपनी मधे कामाला यायची. स्वतःचे वडिल उद्योगपती असताना ही मुलं कधीच कामाला लाजली नाहीत म्हणून आज यशापर्यन्त पोहोचली आहेत. आणि आमच्या आजच्या मुलांना वडिलांनी काम सांगण्या आधीच आई म्हणते “तो-ती इंजीनियरिंगला आहे,याला आहे — त्याला आहे, त्याला काम नका सांगू”.
जीवनात कोणतेही काम हे कमी नसते आणि कामापेक्षा कोणी मोठे नसते हे प्रल्हाद छाब्रिया (Pralhad P Chhabria) यांनी सिद्ध करुण दाखवले. आज मेहनतीच्या जोरावर फिनोलेक्स एका उंच शिखरावर विराजमान आहे.
फिनोलेक्स म्हणजे शेतकऱ्यांशी जोडलेल ५० वर्षाच अतुट नात बनले आहे….
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.