सुवेझ कालवा बंद झाल्याने पेट्रोल डिझेल अजून महागणार?

0
सुवेझ कालवा बंद झाल्याने पेट्रोल डिझेल अजून महागणार?
Share

सुवेझ कालवा बंद म्हणजे आशिया आणि युरोप खंडाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग बंद. सुवेझ कालव्यामुळे आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक कमी अंतरात होऊन जागतिक बाजारपेठ तेजाने वाढण्यास मदत झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कालव्याला मोठे महत्त्व प्राप्त आहे.

सुवेझ कालवा बंद झाल्याने पेट्रोल डिझेल अजून महागणार?

जागतिक पातळीवरील सुवेझ कालव्याचे महत्व

पश्चिम आणि पूर्वेदरम्यानच्या सर्व व्यापारासाठी या कालव्याचा वापर केला जातो, कारण दरवर्षी जागतिक व्यापारातील 10 टक्के व्यापार वाहतूक या मार्गाने होत असते. दररोज येथून जाणारी सरासरी 50 जहाजे दररोज सुमारे 9.5 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू घेऊन जातात. या वाहतुकीत खनिज तेल पासून तर नाशवंत वस्तूंचा समावेश आहे.

सुवेझ कालवा बंद का आहे?

23 मार्च रोजी, हवामान बदलामुळे, चीनहुन नेदरलँड्सला जाणारे एमव्ही एव्हर गिवेन हे जहाज कालव्याच्या एका अरुंद तटात अडकले आणि त्यामुळे सुवेझ कालवा मधील सर्व वाहतूक खोळंबली. सध्या दोन्ही बाजूला 200 हून अधिक जहाजे अडकली असून जागतिक पुरवठ्यावर या घटनेचा ताण पडत चालला आहे. या ब्लॉकचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. काही देशांमध्ये या घटनेमुळे तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

आपल्या देशात पेट्रोल डिझेल किमती वाढणार?

सुवेझ कालवा मार्गे कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करणारे देश

तेल, वायू विश्लेषक व्होर्टेक्साच्या आकडेवारीनुसार भारत देश हा चीन, दक्षिण कोरिया किंवा सिंगापूरपेक्षा जास्त आयात ही सुवेझ कालवा द्वारे करतो. भारतातील दोन तृतीयांश खनिज तेल आयात ही आखाती प्रदेशातून केली जाते. जर येत्या 27-28 मार्च पर्यंत सुवेझ कालवा खुला झाला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे मोठे परिणाम होऊ शकतात. भारत सुवेझ कालवा द्वारे दररोज सुमारे 500,000 बॅरल खनिज तेलाची आयात करतो. यामुळे जेवढे दिवस हा सुवेझ कालवा बंद राहील तेवढा मोठा परिणाम पेट्रोल डिझेल च्या किमतीवर होईल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.