Sunburn Festival Pune
पुणे येथे होणाऱ्या सनबर्न विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देत कार्यक्रमाला काही ठराविक नियमावली लावत परवानगी दिली. आयोजक आणि राज्य सरकारला ही परवानगी दिली गेली आहे, त्यात अल्पवयीन मुलांवर मद्यपान करण्यास बंदी आणि तब्बल 150 कॅमेरे आणि 300 बाउंसर तैनात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांना ही परवानगी दिली गेली आहे. काही दिवसांपूर्वी बावधन गावातील लोकांनी या कार्यक्रमाला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर निकाल देत न्यायालयाने सनबर्न ला परवानगी दिली आहे.
Sunburn Festival Pune | Culture of India
यावर्षी सनबर्न चे आयोजन गोवा मध्ये केले होते परंतु ड्रग चा अतिवापर यामुळे सरकारने आयोजकांना परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांनी पुण्यात आपला मोर्चा वळवत मोशी मध्ये कार्यक्रम घेण्याचा बेत आखला परंतु गावकऱ्यांनी आपली संस्कृतीचा ऱ्हास होईल या कारणास्तव विरोध करत आयोजकांना गाशा गुंडाळायला लावला. परत लोणीकंद मध्ये सुद्धा विरोध झाल्याने शेवटी बावधन मध्ये आयोजन करण्याचा बेत आयोजकांनी आखला. २८ ते ३१ डिसेंबर ला या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
परंतु गावकऱ्यांनी याला विरोध करत ग्रामसभेत कार्यक्रमाला परवानगी नाकारली. यावर उच्च न्यायालयाने काही नियम लावत सनबर्न ला परवानगी दिली आहे.
©PUNERISPEAKS