जी चौकशी करायची ती करा; धमक्यांना मी घाबरत नाही – सुप्रिया सुळे

0
जी चौकशी करायची ती करा; धमक्यांना मी घाबरत नाही – सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान..

सामान्य लोकांमध्ये फिराव मगच त्यांना सामान्यांचे अश्रू दिसतील. आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचे अश्रू मगरीचे वाटत असतील तर त्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरून पहा.

असा मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला..

गेली तीन वर्षे झाले ते आमची चौकशी केली जाणार असल्याचं बोलत आहेत. त्यांना जी चौकशी करायची आहे ती त्यांनी करावी, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे ‘डल्लामार’ पुरावे सभागुहात मांडणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांवर निशाना साधला होता. याला सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्रमकपणे प्रतिउत्तर देण्यात आले आहे. आज सरकार विरोधात नागपूरमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतले.

Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.