गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापट यांना इंदापुरात बोलताना दिला.
पुणे: पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे कायम वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात.
असाच एक नवीन वादाला तोंड गिरीश बापट यांना द्यावे लागतेय.
वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी डाळिंब उत्पादकांना संबोधित करताना पुण्यात केलं होतं.
गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापट यांना इंदापुरात बोलताना लगावला.
सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत, “गिरीश बापट यांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती आदरणीय मा. बापट साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात ठेऊन बोलले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते,” असे म्हणाल्या.
गिरीश बापट यांचे वक्तव्य:
वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या.पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या, असं गिरीश बापट राष्ट्रीय डाळिंब परिषद मध्ये बोलताना म्हणाले होते. डाळिंब उत्पादकांनी केलेल्या मागण्यांवर बोलताना ओघात बापट स्वतःच्याच सरकारवर बोलून गेले.
बापट हे कायमच स्वतःच्या बोलण्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. तरुणाईला संभोधताना ‘हिरवा देठ‘ वक्तव्य सुद्धा चांगलेच गाजले होते.
त्यांचे वक्तव्य:
गिरीश बापट यांचे ‘हिरवा देठ’ वक्तव्य:
यावर आपले मत आम्हाला नक्की कळवा..
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.