सर्वसामान्य नागरिक व शेतकरी संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही.
तीन वर्षांत सरकार काही करू शकेल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले. या सर्वाच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे “हल्लाबोल” आंदोलन सुरू आहे, अशी माहिती खासदार सुप्रीया सुळे यांनी शुक्रवारी वार्ताहर परिषदेत दिली.
शेतकऱ्यांशी संवाद साधत ही पदयात्रा पुढे जात राहील. शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्या पूर्ण झाल्या किंवा नाहीत यासाठी शेतकरी, नागरिक, तरुण-तरुणींशी संवाद साधत ही पदयात्रा नागपूर येथे धडकणार आहे. त्या ठिकाणाहून विधानभवनावर शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादी हल्लाबोल करणार असल्याचे सुप्रियाताई बोलल्या.
शेतकरी संकटात असतांना आता वीज कपात धोरण अवलंबत आहे. आधीच एवढ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणण्याचा हा प्रकार निंदनीय आहे, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.