नुकतेच मा. चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही याची हमी दिली होती.
त्यावर सर्वत्र हसे झालेच कारण दरवर्षी पावसाळा संपला की नेते मंडळी रस्ता सुधारू, हे करू ते करू चे नारे देतच असतात पण वर्ष उलटले तरीही काही हालचाली दिसत नाहीत.
मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या आश्वासनावर मात्र सुप्रियाताईनी चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय. त्यांनी चक्क खड्डयांसोबत फोटो काढून #SelfieWithPothholes या हॅशटॅग चा वापर करत सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यात चक्क त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टॅग केले असून त्यांचे प्रत्युत्तर पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5
— Supriya Sule (@supriya_sule) November 1, 2017
आपल्याला यावर काय वाटते.. आम्हाला नक्की कळवा @PuneriSpeaks वर