मुंबईचा लालबाग गणपतीच्या दर्शनाला रोज कोणीना कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व येतेच.
अशाच गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा म्हणजेच खास लालबाग गणपती चा आशीर्वाद घेण्यासाठी NCP च्या खासदार सुप्रिया सुळे गेल्या असता त्यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी झुंबड लागली. खास करून पोलीस आणि पोलीस अधिकारी सेल्फी घेण्यासाठी सरसावले.
मागील आठड्यापासून आपल्या मतदार संघात आणि जिल्ह्यातील दौऱ्यानंतर सुप्रियाताई आज मुंबईत आल्या होत्या. त्यांनी सकाळी 10.30 सुमारास लालबाग येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या बाहेर आल्यावर गणेश भक्तांसोबतच पोलिसानीही त्यांना गराडा घातला. आणि सेल्फी काढून घेऊ लागले. काहीजण एकटे तर काहीजण ८-९ च्या ग्रुपने सेल्फी काढून घेत होते.
काहीवेळ इकडची तिकडची विचारपूस करून शेवटी सुप्रिया सुळे तिथून बाहेर पडल्या. बऱ्याच वेळ त्या तिथे भक्तिमय झाल्या होत्या.
अन…पोलिसही सरसावले सुप्रियाताई बरोबर सेल्फी काढायला
