सर्जिकल स्ट्राइक बातमी: पाकिस्तानातील नियंत्रण रेषेवर दहशतवादी लाँच पॅडवर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक व्हिडिओ समोर आला आहे.
28 आणि 29 सप्टेंबर 2016 च्या मध्यरात्री भारतीय लष्कराने जोरदार तयारीनिशी पाकिस्तान नियंत्रण रेषा पार करीत दशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. लष्करी कमांडोजच्या साहसी हल्ल्याच्या 636 दिवसांनंतर सर्जिकल स्ट्राइक चा व्हिडिओ उघड करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे लष्करी कमांडोजने पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केलेले दिसत आहे.
सर्जिकल स्ट्राइक व्हिडिओ
In English
In Hindi
व्हिडिओ कमांडोजच्या हेलमेटवर बसलेल्या कॅमेरे आणि आकाशात घिरटया घालणाऱ्या ड्रोन ने हा व्हिडिओ कॅप्टर केलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरीचा हल्ला ज्यामध्ये 17 सैनिकी अधिकारी ठार झाले होते त्याची शिक्षा पाकिस्तानी दहशतवाद्यांना नक्की देणार असे म्हणले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या जवळपास पाच तासाच्या ऑपरेशनमध्ये सात दहशतवादी लाँच पॅनेज नष्ट करण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये 50 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
प्लॅस्टिक बंदी: पुण्यात ८००० किलो प्लॅस्टिक जप्त, ३६९००० ₹ चा दंड वसूल
Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai