राजकारण्यांना माझा तळतळाट लागेल, स्वप्नील लोणकर च्या आईचा आक्रोश

0
राजकारण्यांना माझा तळतळाट लागेल, स्वप्नील लोणकर च्या आईचा आक्रोश
Share

स्वप्नील लोणकर च्या आत्महत्येनंतरचा त्यांच्या आईचा आक्रोश आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा आहे. स्वप्नीलने MPSC च्या पूर्व आणि मुख्य अशा दोन्हीही परीक्षा पास होऊनही सरकारच्या वेळकाढू धोरणांमुळे त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे.

वयाच्या २४ व्या वर्षी स्वप्निल लोणकर याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. ऐन तारुण्यात त्याने हे पाऊल उचळल्यामुळे त्याच्या आईने टाहो फोडत राजकारण्यांना जाब विचारला आहे.

स्वप्नील लोणकर च्या आईचा व्हिडिओ

‘मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं… दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडत राजकारण्यांना जाब विचारला आहे.

सरकारला यातून जाग येऊन लवकरात MPSC २०१९ च्या मुलाखती आणि MPSC २०२० ची मुख्य परीक्षा सुरू होतील अशी आशा करूयात.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.