तब्बल ९ वर्षानंतर ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेच्या यशानंतर अमोल कोल्हे घेऊन आलेत नवीन मालिका आणि तीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित..
अमोल कोल्हे या मालिकेत मुख्य भूमिकेत असून त्यांनी या मालिकेची निर्मिती सुद्धा आपल्या खांद्यावर घेतली आहे.संभाजी राजेंनी आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, शौर्य व कर्तृत्वाचा संगम करत ज्याने सर्व लढाया जिंकल्या अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोहोचलेली नाही. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.
या मालिकेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक तयारी केली असून ही मालिका एका महान राजाचा इतिहास गौरवीत करेल अशी आशा
त्यांनी व्यक्त केली.
या मालिकेचे Title Song नुकतेच प्रदर्शित झाले असून याची ख्याती पसरत आहे
डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारली होती. आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ते संभाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय देतील यात काही शंका नाही.
हिंदुस्थानातील इतिहासातला एकमेव ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे राजे संभाजी. संभाजी महाराज जर आणखी काही काळ असते, तर संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी बदलला असता. त्यांचाच इतिहास मी तरुणांना सांगण्यासाठी ही मालिका करतोय असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.