Swine Flu Information in Marathi । स्वाइन फ्लू ची लक्षणे । स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा

0
Swine Flu Information in Marathi । स्वाइन फ्लू ची लक्षणे । स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा

Swine Flu Information in Marathi, स्वाइन फ्लू मराठी माहिती, स्वाइन फ्लू ची लक्षणे,

स्वाईन फ्लू (Swine Flu):

स्वाईन फ्लू (Swine Flu) हा एक अतिशय संसर्गजन्य असा विकार असून याचा संसर्ग स्वाईन फ्लू विषाणू (एच-१ एन-१) पासून होतो. स्वाईन फ्लूमध्ये साधारण सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असतात. स्वाईन फ्लू (Swine Flu) एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. साधारण दिसणाऱ्या लक्षणांमधून स्वाईन फ्लू आजारामुळे मृत्यु उदभवू शकतो.

स्वाईन फ्लू संसर्ग

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

स्वाइन फ्लू ची लक्षणे

साधारण फ्लूसारखीच स्वाइन फ्लूची लक्षणे असतात.
थंडी
ताप
सर्दी
खोकला
घसादुखी
अंगदुखी
पोटदुखी
मळमळ
उलटी
जुलाब
पोटदुखी

swine flu symptoms
अशी स्वाईन फ्लू ची लक्षणे आहेत.

स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा

१. हात नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाणे टाळा.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून संपर्कात न येणे.

४. खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल लावावा.

५. पाणी भरपूर प्यावे व पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

६. रोज पौष्टिक आहार घेणे, सहसा बाहेरचे खाणे टाळावे.

७. हस्तांदोलन करणे टाळावे.

८. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

९. आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत.

११. तोंडावर मास्क घालावा.

स्वाईन फ्लू गैरसमज

स्वाइन फ़्लू मुळे लगेच मृत्यु होतो हा एक गैरसमज आहे. रोगाचे उशिरा निदान झाल्यास आणि उशीरा उपचार मिळाल्यास किंवा प्रतिकार शक्ति कमी असल्यामुळे रुग्ण दगावू शकतो. रुग्णाला मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असल्यास स्वाईन फ्लू ने मृत्यु होण्याचा धोका वाढतो.

स्वाईन फ्लू उपचार

रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. स्वीने फ्लू चा उपचार शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.

स्वाईन फ्लू वर उपचार आणि संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधक औषधे दिल्या जातात. औषधांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • ऍडामांटनेस (अमांटॅडाईन व रेमांटॅडाईन)
  • ओसेल्टामिवीर व झॅनम्वीर

स्वाईन फ्लू हेल्पलाईन

पुणे महानगरपालिका

स्वाइन फ़्लू विषयी कोणतीही शंका असल्यास आपण PMC हेल्पलाईनवर संपर्क करू शकता.
०२० – २५५०६३१७

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

“नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा

महाराष्ट्र आणि मिसळ….!

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.