तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप, नाना पाटेकर यांनी पाठवली नोटीस

0
तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप, नाना पाटेकर यांनी पाठवली नोटीस

बॉलिवूडमधील अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

Tanushree Datta Nana Patekar यांचा ‘हॉर्न ओके प्लीज’ हा 2008 साली आलेल्या चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने Zoom TV ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Tanushree Datta Nana Patekar Misbehaviour Interview

‘हॉर्न ओके प्लिज’ सिनेमाच्या एका गाण्याच्या शूटिंगवेळी त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री ने केला आहे. नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेऊन कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा हे शिकवायला लागले तेव्हा अनेक लोक आजूबाजूला असून कोणीही त्यास विरोध केला नाही.

‘सोलो’ डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही नाना पाटेकरांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता, अशी मागणी त्यांनी निर्मात्यांपुढे ठेवली होती. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री सांगते.

चित्रपटसृष्टीच्या दुतोंडीपणाचा मला वैताग आला असल्याचे ती म्हणाली. नाना पाटेकरांनी सर्वांसमोर माझ्याशी गैरवर्तन केलं, तरी ते आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत, या गोष्टीची तनुश्रीने चीड व्यक्त केली.

आशिक बनाया आपने, चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीड सारख्या काही सिनेमांमधून तनुश्री दत्ता झळकली असून 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

नाना पाटेकर यांची नोटीस

गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी ही माहिती दिली. ‘तनुश्रीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. तिच्या आरोपांमुळे नाना पाटेकर यांची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे तनुश्रीने जाहीर माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस तनुश्रीला पाठविण्यात आल्याचं राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितलं.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती?

मी कार्यकर्ता: साहेबांचा कार्यकर्ता

दोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.