सर, जाऊ नका! जी. भगवान या शिक्षकाच्या बदलीचा विद्यार्थ्यांनी केला विरोध, विद्यार्थ्यापुढे नमते होत शाळेने बदली ढकलली पुढे
एक साधा शर्ट आणि राखाडी पँट मध्ये एक विद्यार्थ्यांनी वेढलेला तरुण माणूस आणि रडत असेलेले विद्यार्थी असा हा प्रसंग बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
वेलीयागरममधील सरकारी हायस्कूलच्या इंग्लिश शिकवणाऱ्या या शिक्षकांच्या बदलीवरून शाळेतील मुलांनी शाळेला जेरीस आणत त्यांच्या आवडत्या शिक्षकाला जाण्यापासून रोखले.
28 वर्षीय जी. भगवान यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली होती आणि हे शाळेतील विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी जी. भगवान यांना रोखून धरत बदलीचा विरोध केला. विद्यार्थ्यांच्या या प्रेमामुळे जी. भगवान यांना सुद्धा रडू कोसळले.
या भावनिक क्षणाची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. जी. भगवान यांची अरुंगुलममधील शासकीय शाळेत बदली करण्यात आलेली होतो परंतु विद्यार्थ्यांनी केलेल्या विरोधामुळे या आदेशाला 10 दिवसांची स्थगिती मिळाली आहे. 10 दिवसानंतर त्यांच्या बदलीबद्दल निर्णय होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना समर्थन करत बदलीचा विरोध केला आहे.
या प्रसंगामुळे सर्वत्र या शिक्षकाची वाहवा होत असुन असे शिक्षक असावेत असे सर्वजण मत मांडत आहेत.
विद्यार्थ्यांबरोबर एवढे वैयक्तिक बंध तयार कसे झाले यावर बोलताना जी. भगवान म्हणाले की, “मी केवळ शैक्षणिक विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न न करता विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. मी कथा सांगतो, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेऊन त्यांच्या भविष्याबद्दल त्यांच्याशी बोलतो. प्रोजेक्टरद्वारे विविध गोष्टी त्यांना दाखविल्या. हे प्रोजेक्टर सत्र, विशेषतः त्यांच्यासाठी खूप मोहक असे असायचे. माझे आणि विद्यार्थ्यांचे हे बंधन शक्य झाले कारण मी विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. एक शिक्षकापेक्षा जास्त मी त्यांचा एक मित्र आहे.
अशा या शिक्षक-विद्यार्थी नात्याबद्दल आपल्याला काय वाटते? हे बंध वाढवण्यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे आपणास वाटते का?
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
राहुल फटांगडे च्या खुनाचा व्हिडिओ प्रसिद्ध, समाजकंठकांकडून निर्घृणपणे खून