सनीला याची कल्पनाही नव्हती.
सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी बरीच कमी झाली आहे. विविध मार्गांनी सोशल मीडियाचा वापर करत सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. त्यापैंकी काही तर कमेंट बॉक्समध्ये अनेकांच्या प्रश्नांची उत्तरंही देतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अशाच काही चेहऱ्यांपैकी एक म्हणजे सनी लिओनी. सनी नेहमीच ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या सनीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कारण, त्यात सनी चक्क धूम ठोकून पळताना दिसतेय.
आपल्या टीमनेच केलेल्या प्रँकचा व्हिडिओ शेअर करत सनीने सेटवर असणारे खेळीमेळीचे वातावरण सर्वांसमोर आणले आहे. व्हिडिओ प्रचंड गाजण्याचे कारण म्हणजे सनीची व्यक्त होण्याची पद्धत. सनी काहीतरी वाचत बसलेली असतानाच टीममधील एका सदस्याने तिच्याजवळ साप आणला, पाठमोऱ्या सनीला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पण, जेव्हा तिने तो साप पाहिला तेव्हा मात्र ती घाबरून धूम ठोकून पळून गेली. त्यावेळी सेटवर एकच हशा पिकल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
सनीने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांनीच पाहिला असून, त्यावर बऱ्याचजणांनी कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहताना अशी धमाल टीम असेल तर कोणत्याच कलाकाराला काम करताना अजिबात थकवा येणार नाही असे म्हणणे वावगे ठरत नाही.