तीरा कामत वरील उपचाराचा मार्ग मोकळा, केंद्राकडून 6 कोटींचा कर माफ

0
तीरा कामत वरील उपचाराचा मार्ग मोकळा, केंद्राकडून 6 कोटींचा कर माफ
Share

तीरा कामत या ५ महिन्याच्या बाळावरील उपचाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या 5 महिन्यांच्या तीराच्या उपचाराचा लागणार असणाऱ्या इंजेक्शन वरील कर माफ करून सरकारने मोठा अडथळा दूर केला आहे. त्यामुळे तीरावर आता उपचार होऊ शकतात. केंद्र सरकारने अमेरिकेहून मागवायच्या या इंजेक्शन वरील कर 6 कोटी रुपयांची करमाफी केली आहे.

तीरा कामत च्या वडिलांनी यावर इंजेक्शन वरील लागणाऱ्या करावर आवाज उठवला होता. ऑनलाइन आवाज उठवत अनेक नेत्यांना साकडे घातले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. यानंतर केंद्र सरकारने ही करमाफी केल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य सरकारकडून सुद्धा कामत कुटूंबियांना मदत झाली आहे. यात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा लक्ष देत केंद्रातील नेत्यांशी संपर्क साधून दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता.

कोण आहे तीरा कामत?

५ वर्षीय तीरा कामत या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीराला एसएमए टाइप 1 या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे मुलीचे आयुष्य केवळ 18 महिन्यांपर्यंत असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी अमेरिकेतील हे इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. या आजारावर एकच उपाय आहे तो म्हणजे एक महाग इंजेक्शन. भारतात ते उपलब्ध नसून फक्त अमेरिकेत ते उपलब्ध आहे. परंतु त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. कामत कुटुंबियांना लोकसहभागातून 16 कोटी रुपयांची मदत मिळाली. पण या औषधांवर 6 कोटींचा अतिरिक्त कर लागणार होता. 6 कोटी रुपयांचा तब्बल कर लागत असल्यानं हा कर माफ करावा यासाठी कामत कुटुंबीय आणि काही कलाकारांनी देखील प्रयत्न केले. पंतप्रधानांनी याची दखल घेत पूर्ण करमाफी दिली आहे.

कामत कुटुंबियांना या बातमीने मोठा दिलासा मिळाला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.