शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे “ठाकरे Thackeray” या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
Thackeray Film : Director Abhijeet Panse
बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी झळकणार असून हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी भागात खुद्ध नवाजुद्दीन सिद्दीकी च आपला आवाज कायम ठेवणार असून मराठी डबिंगचं काम सुरू आहे. मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी एका मोठ्या मराठी कलाकाराची निवड करण्यात आली आहे.

Thackeray या मराठी चित्रपटात बाळासाहेबांना अभिनेते सचिन खेडेकर हे आवाज देणार आहेत. सचिन खेडेकरांनी नुकतेच डबिंग चे काम पूर्ण केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट पाहण्यास सर्व प्रेक्षक आणि त्यात विशेष म्हणजे शिवसैनिक खूप उत्सुक आहेत.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. हि पटकथा लिहिण्यास त्यांना जवळपास चार वर्षे लागली. अभिजीत पानसे हे या Thackeray चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिजीत पानसे यांनी याआधी ‘रेगे’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. २३ जानेवारी २०१९ रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात बसू शकत नाही, त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केले आहे,’ असं संजय राऊत म्हणाले.
आपण या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहात का? नवाजुद्दीन बाळासाहेबांचे पात्र उत्तम रंगवेल असे आपणास वाटते का? आपले मत आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण? काय घडली होती घटना…..