स्वतःचा विचार करताना ?| लेखक अजिंक्य भोसले
आजकालच्या जगात वावरताना आपण एकाच जागी अणि सबंध जग आपल्या शेजारून आपल्याला ढकलून पुढे जात असल्याचा भास कधी होतो का? नसेल तर आपण आपले नाही आणि समजले तर या जगातले आपण नाही. किती अस जगतो आपण आपल्या मर्जीने? उठल्यापासून आवरण्याच्या हुकुमावरून ते रात्री झोपायच्या वेळेपर्यंत सगळंच आपल नियमबध्द आयुष्य. जग लोकशाहीच असल तरी आपण हुकुमशाहीतच वावरत असतो. हि हुकुमशाही आपण झुगारून लावत नाही. त्याचा स्वीकार करतो. का? सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचे पदार्थ. बाहेर खायचे पदार्थ नेमके कुठ खायचे, कोणत्या टपरीवर चहा प्यायचा, अगदी सिगरेटच्या ब्रँड पासून दारूपर्यंत सगळ आपण आपल्या मर्जीने, आवडीने निवडतो. मग हे आयुष्य इतक किमती असताना ते आपण जगतो ते हि आपल्या मनाविरुध्द.
नेमक हेच समजत नाही लोकांना. कि घ्याव काय आणि जगाव काय? एका रस्त्याने अनेक गाव गाठू शकतो आपण. गाव तिथेच असतात रस्ता फक्त त्या गावातून किंवा गावाजवळून जाणारा असतो आणि त्यावरून चालणारे अगणित लोक. जे आपल्या मर्जीने आपल्याला हव तिथ त्या गावात जात राहतात. पण रस्ता हा तिथच राहतो. जिथ तो असतो. तो रस्ता पहिला सुस्थितीत नंतर खड्डे पडून पडून नंतर अगदी कच्चा रस्ता बनून जातो. आणि त्यावर चालणारी लोक? ती मात्र तशीच राहतात. त्यांच्यात आणि त्यांच्या प्रवासात काहीही बदल होत नाही. हा फरक आहे. आपण त्यातले लोक व्हाव. रस्ता नाही. पण रस्त्याच्या सफाईपणाला भुलणारे लोक कायम त्या रस्त्यावरून वावरताना प्रवास करताना शेवटी शहरातून अखेर गावातच पोचतात. जिथे गाडी हि नीट चालू शकत नाही. हुकमाचे एक्के पानात छान वाटतात पण हुकुमशाहीतले हे लोक फक्त जोकर वाटतात. स्वतःसाठी जगणारे फार मोठे होऊन गेले. आणि जगासाठी जगणारे ते फक्त त्यांना वाचून अभ्यास करत राहिले. मी काल काय होतो त्या पेक्षा मी आज काय वागेन आणि उद्या मी आजचा विचार करताना स्वतःला काय म्हणून बघेन हा विचार जो करेल त्याच भविष्य उत्तम. बाकी काल जे झाल ते रोजच काल झाल्यासारखं बोलत बसणारे जगात काय कमी आहेत का ?
मी माझा राजा म्हणवून कोण घेत का स्वतःला ? घर आणि नोकरी यात दोन्ही ठिकाणी स्वतःला गुलाम समजणारे लोक जेव्हा स्वतःला राजा समजतील तेव्हा त्याचं आयुष्याच राज्य त्यांच्या ताब्यात राहील. आणि अगदी उत्तमपणे अबाधित राहील. मी, माझ आणि मला याचा विचार कायम स्वतःने करावा. मी- मी काय आणि कोण आहे. हे फक्त मलाच माहित त्यामुळे त्याचा विचार जग करत किंवा असा विचार मला येतो त्यापेक्षा माझा विचार मीच केलेला बरा. माझ-मी जे काही चांगल काम करतो किंवा जे काही माझ्या बाबतीत चांगल घडत त्यात माझा हिस्सा काय आहे ? माझ त्यात स्थान काय आहे ? हे शोधन हि तितकच महत्तम आहे. आणि उरल मला- नेमक अजून काय करायचं आहे ? कोणत्या बदलांची मला गरज आहे? ना कि लोकांना. इथे विचार चालला आहे स्वतःचा त्यामुळे मला काय आणि कशाची गरज आहे या गोष्टींचा विचार केला तर मी, माझ पण मला उमगेल. जग फक्त नाव ठेवायला असत आणि आपण आपल्या नजरेत पडत राहतो अशा लोकांमुळे. पण, आपण आपल्याला जर का नावजल तर काय होईल ? लोक काय अस हि बोलतात आणि तस हि. पण एक सांगू, लोक निदान बोलतात तरी आपल्या बद्दल, वाईट का होईना पण आपण आपल्याबद्दल साध एक हि वाक्य दिवसातून एकदा बोलत नाही. हि खंत. आणि मग अशा आपल्या वागण्यामुळे जगलेला अख्खा दिवस आपण जगतो खरा पण तो आपल्यासाठी नाही. आणि मग म्हणून आपण आयुष्य जगत नाही तर संपवत असतो अस माझ प्रामाणिक मत आहे.
तुम्हाला काय वाटत ?
लेखक अजिंक्य अरुण भोसले
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजिंक्य भोसले लेख वाचण्यासाठी:
जिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले