विराट कोहली ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जगातील १०० श्रीमंत खेळाडू मध्ये आता विराटचे नाव आहे. सोशल मिडिया वर त्याचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. दिल्ली च्या या फलंदाजाचे २० मिलियन फॉलोअर्स ट्विटर वर , १५ मिलियन इंस्टाग्राम वर व ३६ मिलियन लाईक्स फेसबुकवर आहेत..
भारतीय क्रिकेट संघाचा कैप्टन विराट कोहली याच्या जीवनात अनेक गोष्टी चालू आहेत. २९ वर्षीय कोहली ने क्रिकेटच्या सर्वच फॉर्माट मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आणि स्वताची लीडरशिप जगाला दाखवली आहे. कोहली च्या रागीट स्वभावाचा फायदा त्याला फिटनेस चे ब्रांड प्रमोट करण्यासाठी उपयोगी होत आहे. कोहली हा आता भारतापुरता मर्यादित राहिला नसून जगात त्याची ख्याती आहे.
What Virat Kohli Earns For Every Instagram Post
फोर्ब्स च्या यावर्षीच्या श्रीमंत खेळाडूंच्या लिस्ट नुसार कोहली ची किंमत हि फुटबाल खेळाडू मेस्सी,गोल्फ प्लेयर रोरी पेक्षा जास्त आहे. कोहली $500,000 (Rs 3.2 crore) एवढे एका इंस्टाग्राम पोस्ट चे पैसे कमवतो, ती फुटबाल लेजंड क्रिस्तियानो रोनाल्डो एवढी आहे.
कोहली फिल्ड मध्ये व फिल्ड च्या बाहेर खूपच लोकप्रिय आहे. साऱ्या भारतभर मुलींच्या क्रश लिस्ट मध्ये कोहलीचे नाव असतेच. त्यामुळे भारतातील खेळाडू हि जगाच्या पाठीवर मागे नाहीत हे आता पाहायला मिळू लागले आहे.