ति दोघ: शाळेतले कोवळे प्रेम

1
ति दोघ: शाळेतले कोवळे प्रेम

ति दोघ: शाळेतले कोवळे प्रेम

भाग 1

सकाळी दहा वाजलेत. वातावरण अस ढगालेल झालय. ना गरम होतय ना थंडी वाजतीय. उगीचच दमट वातावरण झालय. दमट वातावरण तर मुंबईला असत इथ साताऱ्याला नाही. पण आज झालेलं तस वातावरण. रोहितला आईने गरम गरम चपाती आणि मेथीची भाजी बनवून दिलेली. डब्यात पण दोन चपाती मेथीची भाजी आणि कैरीच लोणच दिल. बाटली पाण्याने भरून डबा आणि बाटली त्याच्याकडे दिली. रोहित जेवला. रोज पोट भरायचं जेवून त्याच आज त्याला कसस होत होत. पोटात गोळा आलेला. सव्वा दहा वाजले तरी घरातून त्याचा पाय निघेना. वडिलांनी जस त्याच नाव घेतल तस रोहितच लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेल आणि मग त्याला दिसल दहा वाजून बावीस मिनिट झालेत. पंधराच मिनिट राहिलेत शाळा भरायला. तरी सुद्धा कपाटापाशी काहीतरी शोधायची नाटक करून टंगळ-मंगळ करत त्याने पावणे अकरा वाजवले. आणि मग तो घराबाहेर पडला. आणि थेट शाळा गाठली.आणि चालत चालत हळू हळू.
राष्ट्रगीत सुरु झाल. आणि शाळेच्या गेटपाशी उशिरा येणाऱ्या मुला-मुलींना उभ केल होत. त्यात आता रोहितची हि वाढ झाली. राष्ट्रगीत झाल. प्रार्थना झाली. आणि मग तास सुरु झाले. आणि उशिरा येणार्यांना दोन हातावर दोन दोन छड्या देत एक शिक्षक मुलांना ओरडत होते. साहजिकच आहे कारण आज १५ जून तारीख होती. शाळेचा पहिला दिवस. आणि पहिल्याच दिवशी उशीर केलेला मुलांनी, हे बरोबर नव्हत ना.
रोहितचा नंबर आला आणि त्याला हि दोन छड्या मिळणार होत्या. उजव्या हातात ताकद जास्त असते. त्यामुळे त्यान त्यावर छडी खाल्ली. पण डाव्या हाताची छडी खाताना हात त्याने माग घेतला आणि छडी हुकली आणि म्हणून त्याला दोन ऐवजी तीन छड्या मिळाल्या. पहिल्याच दिवशी त्याचे मार खाऊन शाळेत स्वागत झाल होत.
वर्गात आला तसा दारातच थांब अस वर्गशिक्षकांनी त्याला आदेश दिला आणि नको तेच झाल. अख्खा वर्ग त्याच्याकडे शाळेत उशिरा भूत आल्यासारखं बघत होत. मग नंतर दहा मिनिटांनी वर्गशिक्षकांनी त्याला वर्गात घेतल. जागा तर नव्हती बसायला. कारण अख्खा वर्ग भरलेला होता. पण मग शेवटी एका मुलाशेजारी जागा मोकळी होती ती त्याला दिसली. रोहित तिथ गेला आणि त्या मुलाने म्हणजे असिफने दप्तर बाजूला घेतल आणि रोहित तिथ बसला. रोहितला बसवत नव्हत तिथ. कारण मागच्यावर्षी याच मुलाशी त्याच भांडण झाल होत. हमरातुमरीवर अगदी पोचलेलं भांडण. एक वर्ष घेतलेली दुष्मनी आज संपली होती. मराठीचा तास सुरु होता. सगळ्याचं तिकड लक्ष होत. कारण, धडा नवीन होता म्हणून ? नाही. मग शिक्षक नवीन होते म्हणून? नाही कारण शिक्षक कितीही नवीन असले तरी सगळे चिडकेच असतात. मग? नवीन वह्या नवीन पुस्तक. हे कारण होत. कस आहे कितीही पुढच्या वर्गात गेलो आपण तरी आपल्याला या नव्या वह्या पुस्तकांची आवड हि असतेच.
सगळ्यांच लक्ष होत फळ्याकडे. रोहित मात्र वही बाहेर काढत काढत मुलींच्या रांगेत बघत होता. आणि त्याला पूजा दिसली. केसांची हेअर स्टाईल पण तिने बदलली होती. आणि जरा गोरी पण दिसत होती आज ती. मागच्या वर्षी जरा सावळी होती. पूजा अचानक कशी गोरी झाली ह्या विचारात रोहित होता. आणि अख्खा वर्ग शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या विचारात होता कि, स्वामींची पिशवी कुत्र्याने का चोरली ?
तेवढ्यात शिक्षकाने रोहितला उठवून उत्तर विचारल आणि. रोहित उठला पण शांत उभा होता खाली तोंड करून बेंचवर बोट फिरवत. आणि शिक्षक बोलले बस खाली. आणि तो बसला. आणि तास सुरु राहिला पुढे.

भाग 2

ति दोघ: शाळेतले कोवळे प्रेम

रोज शाळेत जाण. वर्गात होणाऱ्या तासाकडे दुर्लक्ष करण. रोजचा उतारा कसाबसा करायचा का तर दुसऱ्या दिवशी वर्गात मार मिळतो. मार मिळायचं हि काही नाही. हात तर काय कोडगे झालेले मार खाऊन, आणि रोहित पण. पण शिक्षक मारताना मुली सगळ्या त्याच्याकडे तोंड करून बघायच्या आणि अजून त्याला लाजल्यासारख व्हायचं. अति लाजल्यासारख तर तेव्हा हि व्हायचं त्याला जेव्हा पूजा त्याच्याकडे बघायची. ती प्रेमाने बघत असती तर काही वाटल नसत रोहितला पण ती अस काही बघायची कि याला स्वतःचीच लाज वाटायची. म्हणून त्याने ठरवलेलं शिकायचं नाही जास्त. वर्गात लक्ष हि द्यायचं नाही जास्त. दंगा मस्ती करायची. पण ज्या ज्या गोष्टीनी त्याला मार मिळेल त्या गोष्टी टाळायच्या. आणि त्याचे तेच प्रयत्न असायचे.
आज वर्ग भरलेला. पण शांत होता. शिक्षक काही तरी कविता शिकवत होते. तास होता मराठीचा. पद्य विभाग शिकवायचं सुरु होत शिक्षकांचं. कविता अशी काही होती कि प्राणीमात्रांवर दया करा. प्रेम करा. प्रेम करा म्हणाल्यावर रोहितने कान टवकारले. जणू काय शिक्षक त्याला बोलले कि, रोहित ने पुजावर आणि पूजा ने फक्त रोहितवरच प्रेम करावे. पण जसे पाण्याचे थेंब एक-सलग अंगावर पडले आणि शर्टाची भाई भिजली त्या गारव्याने त्याला जाग आली. शिक्षक म्हणाले, “ती बंद कर खिडकी”. त्याने ती खिडकी लावली. त्या वेळात पण सगळा वर्ग त्याच्याकडे बघत होता. पूजाही.
काय असत आत्ता? म्हणजे ढगाळलेल वातावरण. रस्त्यावर पडणारा पाउस. आणि खिडकीतून अंगावर येणारा पाउस. वर्गात शांतता. सगळ्या मुलाचं लक्ष वहीत. शिक्षकांचं लक्ष त्यांच्या पुस्तकात. सगळी कशी मग्न असतील कवितेच्या अभ्यासात. मी आणि पूजा रमलो असू एकमेकांच्या डोळ्यातल्या प्रेमाच्या पुस्तकात. शिक्षकांनी दिलेल्या धड्या खालच्या स्वाध्यायची उत्तर लिहिण्यात सगळे किती कष्ट घेत आहेत. बघितला तर स्वाध्याय एका पानाचा. वेडे कुठले. मी आणि पूजा डोळ्यातल्या प्रेमाच्या पुस्तकाची कित्येक पान एका-एका सेकंदाला पलटत असू. असा सगळा विचार रोहित करत आहे. खर त्याच विचाराच विमान अस काही उडत होत, कि पावसाची हि तमा न करता ते उडत होत. उडता उडता ते विमान अचानक खाली कोसळलं. जेव्हा शिक्षकांनी रोहितला उठवून वर्गाबाहेर काढल.

वर्गाच्या बाहेर मान खाली घालून रोहित दाराच्या बाजूला भिंतीला टेकून उभा राहिला. आणि सहज म्हणून शेजारी बघितल तर पूजा. पूजाला शिक्षा का ? या विचारात त्याने तिच्याकडे बघितल आणि हसला. पूजा हि हसली. तास संपला. शिक्षकांनी जाताना दोघांना आत जायला लावल. तसा रोहित खुश झाला. तरी शिक्षक त्याला ओरडलेच, “लक्ष देत जा जरा नाहीतर उद्या घेणार नाही वर्गात.”
काय केल मी या विचारात रोहीत आत गेला. आत बेंचवर बसताना असिफ त्याला बोलला, “ कुठ बघत असतो रे तू ? यडा झालास का ?” त्यावर पुन्हा विचार करून रोहित म्हणाला “कुठ नाही. होत कि लक्ष, का बाहेर काढल मला काय माहित ? आणि पूजाला का बाहेर काढल ? काय माहित काय झालय सरांना.”
“तुझ्यामुळच काढल त्या पूजाला बाहेर. कशाला बघतो तिच्याकडे?” असिफ.
“मी कुठ बघितल. आणि मी बघितल तर काय झाल ? तिला कशाला बाहेर काढायचं ?” रोहित.
“अरे तू बघत होता ना तिच्याकडे म्हणून तिला बाहेर जायला लावल. तरी तू तिच्या शेजारी बसलेल्या त्या विभावरीकड बघत होता ना म्हणून मग तुला बाहेर पाठवल सरांनी.” असिफ.

दोघ गणिताची वही काढून बसले. आणि शिक्षक आले. गणिताचा तास सुरु झाला. आणि नेहमीसारखच आज हि झाल. सगळे तास अर्ध्या-अर्ध्या तासाचे असायचे पण ते कसे लवकर तरी संपायचे. पण गणितच असा होता विषय ज्याचा अर्धा तास पण दोन तासाचा वाटायचा. कसाबसा तास झाला. पाउस सुरूच होता. डबा खायची सुट्टी झाली. सगळे बाहेर पडले. रोहित आणि असिफ हि. कोण डबा हात न धुताच खाण्यात मग्न होते. कोण बाहेर जाऊन दुकानात काही बाही घेण्यात दंग होते. आणि काहींनी रांग लावलेली बाथरूमला जाण्यासाठी. रोहित आणि असिफ खास बाथरूम मधल्या आरशात बघून भांग पाडायला जात होते पण पाउस होता. आणि बाथरूम होत मैदानावर. जरास आडोशाला ते दोघ थांबले. डावीकडे असिफ थांबला. आणि उजवीकडे काही मुली.

त्या पावसाला बघून त्याला आठवत होती फक्त पूजा आणि शेजारी बघितल त्याने आणि त्याला पूजा दिसली. झाल पुन्हा स्वप्न पडल त्याला. अस त्याला वाटल पण तस नव्हत ती खरीच होती त्याच्या शेजारी. आणि त्यालाच बघत होती. रोहित हसला. तीही हसली. “ ऐसे ना मुझे तुम देखो सिने से लागा लूँगा. तुमको में चुरा लूँगा तुमसे दिल में बसा लूँगा” हा हेच गाण लागलेलं सकाळी टीव्हीवर. त्याने येताना ऐकलेलं. आणि तेच गान त्याला तिच्याकडे बघताना आठवल. ती पुढे बघायला लागली. पाऊस कमी झाला ती आता जाणार इतक्यात तिने त्याच्याकडे एकदा बघितल आणि म्हणाली, “अस बघत जाऊ नको माझ्याकडे. मला नाही आवडत” आणि ती निघून गेली. आणि घाबरल्यासारख झालेलं जड हृदय घेऊन रोहित चालत गेला बाथरूम मध्ये. सोबत आधार द्यायला असिफ होताच. आत गेल्यावर असिफने खिशात ठेवलेला कंगवा काढला आणि भांग पडला. आणि रोहितला दिला. रोहितने कंगवा घेतला पण त्याची इच्छाच होईना. कशात काही नसताना त्याला प्रेम विरहाचा अनुभव आला. आणि तो तसाच असिफ सोबत वर्गात आला आणि डबा खायला लागला. पहिला घास तोंडात घातला तोच वर्गात विभावरी आणि पूजा आली. पुन्हा पूजा आणि रोहितची नजरा नजर झाली. आणि रोहीतनेच नजर खाली केली. आणि डबा खायला लागला.

लेखक : Artista Ajinkya Bhosale

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

More:

जिव्हार : प्रेम आणि शेवट

प्रेमाची शप्पथ आहे तुला

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.