टायगर जिंदा है शूटिंग वेळी घडलेल्या अपघातावेळी टीम ला कॅटरिना पेक्षा कॅमेरा ची जास्त काळजी…?

0
टायगर जिंदा है शूटिंग वेळी घडलेल्या अपघातावेळी टीम ला कॅटरिना पेक्षा कॅमेरा ची जास्त काळजी…?

सुपरस्टार सलमान खान चा ‘टायगर जिंदा है’ २0१२ वर्षी आलेल्या ‘एक था टायगर’ चा सिक्वल येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असून तिने चित्रपटाच्या शुटिंग वेळच्या धमाल सांगितल्या आहेत. ‘टायगर जिंदा है’ मध्ये ती भरपूर रोमांचकारी सिन करताना दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये तिने केलेल्या अॅक्शन सीनची झलक पाहायला मिळत असून प्रेक्षक प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यानंतर या सिनेमाशी निगडीत गोष्टी सांगताना. असे म्हटले जाते की, सलमान खान आणि कतरिना कैफसह टायगरची संपूर्ण टीम मोराक्कोमध्ये चित्रीकरण करत होती. एका सीनमध्ये सलमानला घोड्यावर बसून यायचे होते आणि कतरिनाला गाडीत बसून सीन करायचा होता. पण योग्य प्रशिक्षण देऊनही चित्रीकरणादरम्यान तिची गाडी भिंतीला जाऊन आदळली.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली की, ‘मला दुखापत होऊ झाली असती पण टीमला माझ्यापेक्षा गाडीत लावलेल्या महागड्या कॅमेऱ्याची जास्त चिंता होती. मला दुखापत झाली नाही आणि नंतर त्या सीनचेही चित्रीकरण पूर्ण झाले त्यामुळे सर्वजण समाधानी झाले. सिनेमात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेले कॅमेरे वापरले असून त्याची काळजी घेणेही गरजेचे होते. ७ नोव्हेंबरला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आतापर्यंत बॉलीवूड मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर म्हणून या सिनेमाने याआधीच विक्रम केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.