सोशल मीडिया अॅप टिकटॉक ला अनेकांनी 1 स्टार रेटिंग देऊन तीव्र निषेध व्यक्त केला होता. Google Play Store वरील टिकटॉक कंपनीच्या अॅपला कॅरीमिनाटी यूट्यूब विरुद्ध टिकटॉक लढाईमुळे लाखो लोकांनी 1 स्टार गुणवत्ता प्रतिक्रिया दिलेली होती. बर्याच वापरकर्त्यांनी अॅपला 1-स्टार गुणवत्ता रेटिंग दिल्याने अॅपचे संपूर्ण रेटिंग 4.7 वरून घसरून 1.2 वर आले होते. नंतर गूगल ने लाखो प्रतिक्रिया हटवून टिकटॉक चे रेटिंग जसेच्या तसे केले आहेत.

Google ने टिक टॉक अॅप सूचीवरील 80 लाखाहून अधिक रेटिंग हटविली आहेत. ज्याचा परिणाम पुन्हा एकदा रेटिंग 1.2 वरून 4.2 पर्यंत आले आहे. रेटिंग 1.2 असताना 28 दशलक्ष जणांनी रेटिंग दिले होते. आता ते 20 दशलक्षांवर आलेले आहे.
गुगल ने का हटवले रेटिंग?
अॅपचे रेटिंग पुनरुज्जीवित करणे गूगलच्या आपल्या नियमावली नुसार आहे. गुगल अॅप स्टोअरमध्ये किंवा अॅपच्या रेटिंग्जमध्ये अनेक खात्यांकडून समान प्रतिक्रिया दिल्या गेल्यास ते स्पॅम अंतर्गत वर्गीकरण केले जाते. अशा प्रतिक्रिया स्पॅम अंतर्गत गेल्याने त्यांना हटवले जाते. अनेकांनी 1 स्टार देत समान प्रतिक्रिया दिल्या होत्या. यामुळे जवळपास 80 लाख रेटिंग गुगल ने हटवले आहेत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
- आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…
- पिंपरी चिंचवड प्रतिबंधित क्षेत्र | PCMC Containment Zone
- Red Zone in Pune, Pune Area Wise Corona Positive Cases