लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार मध्ये देशातील टॉप फाईव्ह खासदार मध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांनी बाजी मारली आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत पहिला क्रमांक मिळवला आहे.
यानंतर दुसऱ्या स्थानी भाजपचे धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. शिरूर मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मध्यप्रदेश चे सुधीर गुप्ता आणि झारखंड जमशेदपूर मधील बिद्युत महतो यांचा समावेश आहे. परिवर्तन या संस्थेने ही माहिती प्रकाशित केली आहे.
भारतातील टॉप फाईव्ह खासदार
खासदार | पक्ष | मतदारसंघ | विचारलेले प्रश्न |
---|---|---|---|
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेस | बारामती (महाराष्ट्र) | 212 |
सुभाष भामरे | भारतीय जनता पार्टी | धुळे (महाराष्ट्र) | 202 |
अमोल कोल्हे | राष्ट्रवादी काँग्रेस | शिरूर (महाराष्ट्र) | 202 |
सुधीर गुप्ता | भारतीय जनता पार्टी | मंदसौर (मध्यप्रदेश) | 198 |
बिद्युत महतो | भारतीय जनता पार्टी | जमदेशपूर (झारखंड) | 195 |
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुळे यांनी तब्बल 212 प्रश्न लोकसभेत उपस्थित केले आहेत. तर धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी 202 आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही 202 प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी 198 तर झारखंडमधील जमदेशपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी 195 प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार
खासदार | पक्ष | मतदारसंघ | विचारलेले प्रश्न |
---|---|---|---|
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेस | बारामती | 212 |
सुभाष भामरे | भारतीय जनता पार्टी | धुळे | 202 |
अमोल कोल्हे | राष्ट्रवादी काँग्रेस | शिरूर | 202 |
गजानन कीर्तिकर | शिवसेना | मुंबई उत्तर पश्चिम | 195 |
श्रीरंग बारणे | शिवसेना | मावळ | 194 |
सर्वाधिक चर्चेत सहभाग घेणारे महाराष्ट्रातील खासदार
खासदार | पक्ष | मतदारसंघ | सहभाग |
---|---|---|---|
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेस | बारामती | 97 |
राहुल शेवाळे | शिवसेना | मुंबई दक्षिण मध्य | 53 |
डॉ. श्रीकांत शिंदे | शिवसेना | कल्याण | 49 |
श्रीरंग बारणे | शिवसेना | मावळ | 48 |
विनायक राऊत | शिवसेना | रत्नागिरी-सिंधुदुर्ग | 46 |
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.