आपल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर 10 अंकावरून 11 अंकी होणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) ने यावर एक प्रस्ताव सादर केला असून यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.
काय आहे TRAI चा प्रस्ताव
TRAI च्या प्रस्तावानुसार 10 ऐवजी 11 अंकी मोबाईल नंबर वापरल्यास जास्तीत जास्त फोन क्रमांक उपलब्ध होतील. ट्रायच्या या प्रस्तावावर निर्णय झाल्यास मोबाईल नंबरचा सुरवातीचा अंक 9 असेल. तर नवीन एकूण 10 अब्ज मोबाइल क्रमांक तयार होतील, असं TRAI कडून सांगण्यात येत आहे.
लॅन्ड लाईन अरुण मोबाईल फोनवर संपर्क करताना मोबाईल क्रमांकाआधी शुन्य लावण्याचा प्रस्ताव यात देणार आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले ग्राहक लक्षात घेता नवीन क्रमांक उपलब्ध करून देण्यास थानी येत आहेत. त्यासाठी हा नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
देशात सध्या 10अंकी क्रमांक चे एकूण 210 कोटी क्रमांक वाटले गेले आहेत. यात 7, 8 आणि 9 क्रमांकाने सुरु होतात. नवीन निमानुसार डोंगल वापरकर्त्यांसाठी 13 अंकी तर मोबाईल धारकांसाठी 11 अंकी क्रमांक असेल असे TRAI ने स्पष्ट केले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.