पुणे शहर परिसरात वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून पालिकेने सर्वाधिक सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण असलेल्या पुणे शहर भागातील पाच क्षेत्रिय कार्यालयांमधील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली आहे.
सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर होणार असून तशी तयारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे. महापालिका शाळा, खासगी मंगल कार्यालये, वसतीगृह यांमध्ये स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
स्थलांतरित होणारे क्षेत्रिय भाग
- भवानी पेठ,
- ढोले पाटील,
- कसबा पेठ,
- घोले रोड
- येरवडा
या भागातील रहिवाशांचे स्थलांतर होणार आहे. या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण शहरातील एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे 75 टक्के आहे.
या भागात दाट लोकवस्ती असल्याने अनेक घरे शंभर चौरस फुटांची आहेत. या कुटुंबात 4 ते 5 जण असल्यामुळे सोशल डिन्स्टिसिंग नियम पालन होणे अशक्य आहे. यामुळे या भागात कोरोनाच्या संसर्ग अजून वाढण्याचा धोका कायम आहे. या भागातील लोकांना सोयीस्कर जागांमध्ये राहण्याची तात्पुरता व्यवस्था पालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका शाळा, खासगी मंगल कार्यालये आणि वसतीगृह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या खाण्याचा प्रश्न स्वयंसेवी संस्थांच्या सोडवण्यात येईल असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले
पुणे शहर स्थलांतर योजना
- पहिल्या टप्प्यात सुमारे 20 हजार कुटुंबे स्थलांतरीत करण्यात येतील.
- मूलभूत सुविधा जसेकी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा यांची उपलब्धता पालिकेने केली असेल.
- एक आड एक घरातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येईल.
- स्थलांतरित संख्या सुमारे 3 लाख 50 हजार
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
- मराठी कविता: मराठी पोरांनी मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा धुतले
- Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस