प्रवास पास प्रक्रिया: महाराष्ट्र जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांना गावी जाण्याची प्रक्रिया

2
प्रवास पास प्रक्रिया: महाराष्ट्र जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांना गावी जाण्याची प्रक्रिया

महाराष्ट्रात प्रवास पास देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवास पास प्रक्रिया साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मजूर, विद्यार्थी, व्यावसायिक असे अनेकजण अनेक ठिकाणी अडकलेले आहेत.

प्रवास पास प्रक्रिया पुणे

Travelling Pass for pune

पुणे आणि इतर जिल्ह्यातील लॉकडाऊन मुळे अडकलेल्या परराज्यातील व महाराष्ट्रातील मजुर/विद्यार्थी/यात्रेकरु व इतर Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करत अर्ज करण्यास जिल्हा प्रशासन ने सांगितले आहे.

प्रवास पास मिळवण्यासाठी आपल्याला खालील माहिती देणे आवश्यक आहे.

 • स्वतःचे नाव
 • प्रवासाची तारीख
 • मोबाईल क्रमांक
 • प्रवासाचे कारण
 • वाहनाचा प्रकार आणि वाहन क्रमांक
 • सध्याचा पत्ता
 • ई-मेल खाते
 • प्रवास प्रारंभ ठिकाण
 • प्रवास अंतिम ठिकाण
 • सहप्रवासी संख्या
 • अंतिम ठिकाण पत्ता
 • परतीचा प्रवास करणार आहात का

वरील सर्व माहिती भरल्यानंतर लागणारी कागदपत्रे ऑनलाईन सादर करू शकता आणि प्रवास पास साठी आपला अर्ज चाचपणी साठी जाईल. इतर जिल्ह्यात प्रवासी पास मिळण्याचा अवधी कमी झाला आहे. पुणे जिल्हा पास हा काही मिनिटांमध्ये मिळत असून पास फक्त Non Containment Zone मधील लोकांनाच मिळत आहे.

प्रवास पास साठी लागणारी कागदपत्रे

 • नजीकच्या काळातील स्वतःचा फोटो (200 KB)
 • नोंदणीकृत डॉक्टर कडून फ्लू लक्षणे नसल्याचा प्रमाणपत्र (पर्यायी)
 • आधारकार्ड (500 KB)

वरील कागदपत्रे स्कॅन करून तयारी ठेवावीत. आणि खालील प्रक्रिया पूर्ण करावी. मेडिकल सर्टिफिकेट हे शासकीय, मान्यताप्राप्त खाजगी दवाखाने रुग्णालय यामधून मिळेल. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट मिळवणे बंधनकारक नाही. कोरोना चाचणी सुद्धा बंधनकारक नसून फक्त मेडिकल प्रमाणपत्र मिळवून प्रवास पास मिळवू शकता.

सर्व कागदपत्रे तयार असल्यावर खालील लिंक वर आपली संपूर्ण माहितीसह कागदपत्रे ऑनलाइन जमा करावीत.

महाराष्ट्र इतर जिल्हा प्रवास पास

https://covid19.mhpolice.in/registration

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.
020 26111061
020 26123371
E-mail Id:
dcegspune1@gmail.com

पुणे शहर प्रवासासाठी पुणे पोलीस यांच्या वेबसाईट वर प्रवास पास मिळवू शकता.

पुणे शहर प्रवास पास

https://www.punepolice.in/

पिंपरी चिंचवड शहर पास

पिंपरी चिंचवड शहर प्रवासासाठी सारथी या Application वर जाऊन अर्ज करू शकता. खालील लिंक वर जाऊन आपण App डाउनलोड करू शकता.

https://bit.ly/PCMCSmartSarathiApp…

पुणे जिल्ह्यातील तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे :

 • तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com
 • अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com
 • तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com
 • तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com
 • तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com
 • तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com
 • तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com
 • तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com
 • तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com
 • तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com
 • तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com
 • तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com
 • तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com
 • तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com
 • तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.