लोकसभेने गुरुवारी ट्रिपल तलाक विधेयक मंजूर केले आणि त्यातील सर्व दुरुस्त्याही मंजूर करून घेतल्या आहेत. हे विधेयक आता राज्यसभेकडे मंजुरीसाठी गेले असून तिथे ते मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
सरकारच्या वतीने बोलताना एम. जे. अकबर यांनी या निर्णयाला विरोध करण्याऱ्या अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न विचारला. त्यांनी विचारले ‘त्यांना कोणी समुदाय प्रतिनिधी बनविले?’ तत्पूर्वी, भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी मौलवींच्या विरोधात कायद्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की,’तलाक-ए-बिद्दात’चा धर्मांशी काहीही संबंध नाही. त्या पुढे म्हणाले की या देशात महिला सर्वांत अल्पसंख्यांक आहेत आणि म्हणूनच त्यांना समाजात दडपणले जात आहे.
याआधी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सांगितले की, स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या न्याय मिळण्यास ट्रिपल तलाक ने तडा गेला होता. कॉंग्रेसने स्थायी समितीला पाठविण्याचे बिल मागितले आहे,
तर एआयआयएमआयएम आणि बीजू जनता दलाच्या काही विरोधी पक्षांनी मुस्लिम महिलांवर अन्याय करणारा हा कायदा असल्याचे म्हणले आहे. मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक 2017 यात ट्रिपल तलाक साठी अजामीनपात्र अटक आणि 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षेचा प्रबंध केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
बांगड्या-टिकली उतरवल्या, मातृभाषेतही बोलू दिलं नाही..
©PuneriSpeaks