त्रिशनित अरोरा: आठवी नापास आज २ हजार कोटींचा मालक… 

0
त्रिशनित अरोरा: आठवी नापास आज २ हजार कोटींचा मालक… 

त्रिशनित अरोरा: एक २४ वर्षीय तरुण ज्याच्या इशाऱ्यावर सीबीआय, रिलायन्स सारख्या मोठमोठ्या कंपन्या चालतात

शाळेत ८ वी नापास पण जगभरातील ५०० हून कंपन्यांना आपल्या इशार्‍यावर चालवू शकणाऱ्या त्रिशनित अरोरा या २१ वर्षीय युवकाची गोष्ट म्हणजे एक स्वप्नच म्हणावे लागेल. त्रिशनित अरोरा हा एथिकल हॅकर म्हणून उदयास आलेला तरुण त्याच्या टीएसी सिक्युरिटी (TAC Security) कंपनीचा व्यवसाय आज करोडो रूपयांवर पोहचला आहे. त्रिशनित अरोरा या तरुणाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षातच हे अभूतपूर्व यश मिळविले आहे.

trishneet arora
Trishneet Arora with Aruj Jaitley

एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रकचरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण सेवा पुरविण्याचे काम TAC Security ही कंपनी करते. त्रिशनित अरोरा भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल,पंजाब पोलिस, गुजराथ पोलिस, एवन सायकल्स यासारख्या जवळपास ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या TAC Security कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. त्रिशनित अरोरा ला पहिल्यापासून संगणकात खूपच आवड होती व त्यापायीच लहानपणी शाळेत आठवीत असतानाच हॅकिंगच्या नादात दोन पेपर दिले नसल्याने आठवी नापासचा शिक्का बसला. त्याचे वडील अकौंटंट. मुलाच्या या उद्योग जगताचे विश्व त्यांना व परिवाराला कधीच आवडले नाहीत मात्र त्रिशनित अरोरा आपल्या निर्णयावर ठाम होता.

FB POST

आठवी मध्ये परीक्षा न दिल्याने नापास झालेल्या त्रिशनीतला त्याचे मित्रही चिडवू लागले, त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि बाहेरून बारावीची परिक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने TAC Security कंपनीची स्थापना केली व अवघ्या दोन वर्षात यश चालून येत त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट झाले. द हॅकींग एरा, हॅकींग वुईथ स्मार्टफोन्स व हॅकींग टॉक त्रिशनित अरोरा ही त्याची पुस्तकेही तुफान लोकप्रिय ठरली आहेत. पंजाब सरकारने त्याच्या कार्याचा गौरव करत २०१४ ला त्रिशनीत ला सन्मानित केले, २६ जानेवारी २०१५ ला त्याला पंजाब आयकॉन म्हणूनही गौरविले आहे.

trishneet arora त्रिशनित अरोरा

त्रिशनीत अरोरा आपल्या व्यवसायाची उलाढाल २ हजार कोटींवर नेण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी तो कष्ट घेत आहे.

तर कसा वाटला हा प्रेरणादायी प्रवास… आवडल्यास नक्की शेअर करा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

विदेशातील नोकरी धुडकावत माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी बनली आर्मी ऑफिसर, डॉक्टर ते कॅप्टन डॉक्टर श्रेयसी निशंक प्रवास

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.