TRP घोटाळा चा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, दोन टीव्ही चॅनेल्सनी TRP आकडेवारीत वाढ करण्यासाठी निश्चित कालावधीसाठी चॅनल्स सुरू ठेवण्यासाठी थेट पैसे दिले असल्याचे मान्य केले आहे, याबाबत ४ जणांनी आपली साक्ष दंडाधिकाऱ्यांसमोर दिली आहे. यामुळे Republic TV वरील फास आणखीन आवळला गेला आहे.

पोलिस खटल्यात साक्ष दिलेल्या आरोपींना मदतीचे साक्षीदार बनवले गेले आहे. यातील तिघांनी रिपब्लिक टीव्हीने त्यांना पैसे दिल्याचे मान्य केले आहे तर चौथ्या साक्षीदाराने बॉक्स सिनेमाच्या विरोधात साक्ष दिली आहे.
मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुष्टी केली की तीन साक्षीदारांनी रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांचे TRP घोटाळ्यात हात असल्याचे स्पष्ट केले आहे.
TRP घोटाळा तपास
आतापर्यंत अटक केलेल्या पाच जणांपैकी हंसा रिसर्चच्या एका माजी कर्मचार्यांमधील तिघांनी पोलिसांना सांगितले की ते या रॅकेटचा भाग होते आणि ते घरोघरी जाऊन पैसे देत होते. घरोघरी हे चॅनेल सुरू ठेऊन त्यांना त्यासाठी पैसे दिले जात होते. यातून TRP वाढून जाहिरातीमधून पैसे मिळतात.
रिपब्लिक टीव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या वाहिन्यांवर TRP घोटाळा केल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- आयपीएल २०२० स्पर्धेत खेळाडू विकत घेण्यास परवानगी: उपलब्ध खेळाडूंची पूर्ण यादी
- मराठी लढा: वयस्कर लेखिकेने जिद्दीच्या जोरावर हिंदी सराफाला नमवले