भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
विजय मकसरे यांनी तृप्ती देसाईच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी अंतर्गत तक्रार दाखल केली होती त्यावर तृप्ती देसाईंच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
तृप्ती देसाई अॅट्रोसिटी प्रकरण
कोर्टात दिलेल्या माहितीनुसार तृप्ती देसाई यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह विजय मकसरे यांना बालेवाडी परिसरात गाठून त्यांचा मोबाईल त्यांच्याकडून हिसकावून घेत मसकरेंना मारहाण केली. तृप्ती देसाईंनी मकसरे यांना जातीवाचक अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार मसकरेंनी दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे. मकसरे यांनी दरोडा मारहाण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा तृप्ती देसाईंविरूद्ध दाखल केला आहे. त्यात जामिनाचा अर्ज देसाई यांनी पुणे कोर्टात आणि नंतर मुंबई हायकोर्टात केला. पण दोन्ही कोर्टांनी तृप्ती देसाईंचा अर्ज नाकारत त्यांना जामीन फेटाळला.
त्यामुळे तृप्ती देसाई सध्यातरी नॉट रीचेबल आहेत. गेल्या आठवडाभरापासून पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता याप्रकरणी त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावे लागेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.