पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया संन्यास घेण्याचे सूतोवाच केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. सर्व सोशल मीडिया अकाऊंटद्वारेच त्यांनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे बोलले होते.
‘रविवारपासून सोशल मीडियातून बाहेर पडण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलं होतं. यामुळे चाहते मात्र तूर्तास गोंधळले होते. अनेकांनी मांडलेल्या संन्यास मागची सत्यता खोटी ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या सोशल मीडिया वरील संन्यासामागचं सत्य जाहीर केलंय.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून सोशल मीडिया संन्यास ची सत्यता जाहीर केली आहे.
This Women’s Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.
Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs. pic.twitter.com/CnuvmFAKEu
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020
रविवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे, यानिमित्त पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे एक नवीन उपक्रम जाहीर केला आहे. एक दिवसांसाठी ते आपली सोशल मीडिया खाती महिलांच्या हाती स्वाधीन करणार आहेत. आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकाउंट चालवायला कसे मिळवू शकता?

जगाला प्रेरणा देणाऱ्या महिला किंवा तुमच्या आयुष्यात प्रेरणेचं स्थान राहिलेल्या महिलांचा व्हिडिओ आपण आपल्या सोशल मीडिया वरून पोस्ट करायचा आहे. #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून आपण यामध्ये सहभाग नोंदवू शकता.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो
महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व नद्यांमधील जलपर्णी काढणार
- महाराणी येसूबाई यांच्याबद्दल माहिती Maharani Yesubai Information in Marathi
- सलग सहा दिवस बँका बंद राहणार! ATM वर पैशाचा तुटवडा होणार
- म्हणून मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी लावला डीजे
- UP Gold Mine: यूपीमध्ये सापडली भारताच्या साठ्याच्या पाचपट सोन्याची खाण