तुकाराम मुंढे माहिती नसेल असा व्यक्ती महाराष्ट्राचे सापडणे तरी अवघड. एक ध्येयवेडा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत.

तुकाराम मुंढे माहिती Tukaram Mundhe Wiki

तुकाराम मुंढे विकिपीडिया जाणून घेण्याआधी त्यांची असलेली प्रसिद्धी आपल्याला समजून घ्यावी लागेल. जेव्हा एखादा अधिकारी जनतेसाठी निर्णय घेत असतो तेव्हा त्या निर्णयावर स्थानिक राजकारणी नेते आनंदी होतील असे नाही. यातूनच अधिकारी आणि राजकारणी यांच्यात संगनमत घडून जनतेऐवजी पैशासाठी अनेक कामे होताना आपण पाहत असतो. परंतु तुकाराम मुंढे त्याला अपवाद राहत स्थानिक राजकारण्यांना न जुमानता जनतेसाठी धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होत गेले.
अनेकवेळा वादविवाद झाले परंतु त्यातून आपल्या कार्य न थांबवता जोमाने काम करणे याचे उत्तम उदाहरणं म्हणजे तुकाराम मुंढे. आपल्या प्रामाणिक पणासाठी प्रसिद्ध असलेल्या IAS तुकाराम मुंढे यांना अनेक बदल्यांचा सामना करावा लागला. 13 वर्षांच्या सेवाकाळात 12 वेळा बदली झालेले अधिकारी बोटावर मोजण्याऐवढे असतील. राजकारण्यांच्या निशाण्यावर न येण्यासाठी अनेक अधिकारी राजकारणी म्हणतील तसे निर्णय घेत असतात परंतु आपली वेगळी छाप पाडणाऱ्या अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तुकाराम मुंढे माहिती आपण जाणून घेणार आहोत.
तुकाराम मुंढे जन्म, बालपण
3 जून 1975 साली ताडसोना, बीड गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म शेतकऱ्यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेती करत असे. कर्जात बुडालेल्या वडिलांना मदतीसाठी तुकाराम मुंढे आणि त्यांचे भाऊ भाजी विकण्यास जात असे. त्यांचे वडील सावकारी कर्जात बुडालेले होते.
शिक्षण
दहावी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी औरंगाबाद येथे जाऊन त्यांनी औरंगाबाद शासकीय महाविद्यालय मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र यात विषयात आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केले.
तुकाराम मुंढे IAS प्रवास
2001 मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी त्यांनी प्रवेश घेतला आणि यात त्यांनी बाजी मारत दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळवत आपल्या पहिल्या यशाची पायरी रचली. जळगावमध्ये यावेळी दोन महिने त्यांनी व्याख्याता म्हणून काम देखील केले. आपले लक्ष मोठे आहे याची जाणीव असल्याने त्यांनी पुढे आपला अभ्यास सुरू ठेवला.
2005 साली झालेली UPSC परीक्षा त्यांनी दिली आणि ते या परीक्षेत देशात 20 व्या क्रमांकावर आले. IAS या पदासाठी त्यांची निवड होत त्यांच्या प्रसिद्ध अधिकारी प्रवासास सुरुवात झाली.
तुकाराम मुंढे कलेक्टर प्रवास
प्रथम सेवेची सुरवात सोलापूरातून पासून होत बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. तेथून पुन्हा त्यांना बदली करून नांदेडचे उपजिल्हाधिकारी पद देण्यात आले.
पुढे 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. या पदावर निवड झाल्यानंतर ते काही शाळांना भेट द्यायला गेले असता त्यांना अनेक शिक्षक गैरहजर सापडले. यावर कारवाई करत त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले.
शिक्षकांच्या निलंबानंतर त्यांची ख्याती बाधत असतानाच वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांचे निलंबित केले. हे पहिल्यांदाच घडत होते
2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते.
मे 2010 ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली.
जायकवाडी मधून जालन्याला पाणी आणण्याचे काम गेली सहा वर्षे रखडलेले असताना तुकाराम मुंढे यांनी अवघ्या तीन महीन्यात काम पूर्ण करत जालण्याला पाणीमय केले.
पुढे पुन्हा एकदा त्यांची बदली सोलापूर मध्ये झाली. 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर 2012 साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. याच काळात 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर गेला. यामुळे त्यांची वाहवा झाली.
सोलापूर जिल्यात जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांनी अनेक जलयुक्त शिवार योजनेची कामे केली. दत्तक घेतलेल्या 282 गावातील कामे त्यांनी लोकांच्या सहयोगातून फक्त 150 कोटी रूपयांमध्ये करत. यातून पाण्याची समस्या कमी झाली
पुढे पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी 3 हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी CM सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले.
त्यांची खरी प्रसिद्धी तर नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना झाली. ‘आयुक्तासोबत चाला’ हा चालण्याचा कार्यक्रम जनतेने डोक्यावर घेतला. अनेक लोकोपयोगी कामे केल्यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत होता. स्थानिक नेत्यांना त्यांचा बेधडकपणा काही रुचला नाही. त्यांच्या बदलीचे फर्मान आले आणि त्यांच्या बदलीविरोधात जनतेने आंदोलन सुरू केले.
त्यांची बदली पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्षपदी झाली. पुणेकरांना या अधिकाऱ्याकडून अनेक अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा सार्थ करत त्यांनी डबघाईला आलेली PMPML उभारण्याचे काम केले. महीन्याला PMPML ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या 9 लाखांवर गेली. PMPML अध्यक्ष असताना त्यांच्याविरोधात आंदोलने झाली. तुकाराम मुंढे यांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अनेक चालक आणि अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्यांच्याच काळात बस मध्ये GPS लावले गेले. अनेक दिवस चाललेल्या वादानंतर त्यांची पुन्हा एकदा बदली केली गेली
तुकाराम मुंढे नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत झाले. नाशिककर मात्र या बदलीमुळे खुश झाले. तिथेही ते आपल्या कामातून चांगलेच प्रसिद्ध झाले.
तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजप ची अडचण वाढली होती. त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.
पुढे त्यांची बदली एड्स नियंत्रण प्रकल्प संचालक पदी झाली.
नुकतीच त्यांची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी झालेली आहे. सध्या ते आयुक्तपदी चांगलेच गाजत आहेत. कायम उशिरा येणारे पालिकेतील कर्मचारी मात्र आता वेळेवर यायला लागले आहेत.
अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे, प्रामाणिक, बेडर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास @PuneriSpeaks चा सलाम, तुकाराम मुंढे सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख
पुण्यात होणारी मराठ्यांची टिंगल आणि टिंगल करणाऱ्यांना मराठ्यांचं खरमरीत प्रत्युत्तर…