नवी मुंबई महापालिका आयुक्त ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असा प्रवास करणाऱ्या तुकाराम मुंडे यांची ११ महिन्यात पून्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंडे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे.
तुकाराम मुंडे वाद
पुण्यात बदली होण्याआधी तुकाराम मुंडे नवी मुंबई महापालिका आयुक्त पद सांभाळत होते. नवी मुंबई मध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामावर अनेक वेळा आक्षेप घेतला होता. त्यांना लोकप्रतिनिधींनी प्रचंड विरोध केला होता. लोकप्रतिनीधी विरुद्ध तुकाराम मुंडे असा संघर्ष सुरु असताना लोकांनी तुकाराम मुंडे यांना पाठिंबा दर्शवत मोहीम राबवली होती. पण अखेर लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली त्यांची पुण्यात बदली झाली.
पुण्यात बदली झाल्यानंतरही तुकाराम मुंडे वाद कायम राहत त्यांना कडाडून विरोधाला तोंड द्यावे लागले. परंतु त्यांनी लोकहिताच्या कामपुढे संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता आपले कार्य चालु ठेवले. अखेर आता अवघ्या ११ महिन्यातच त्यांची बदली नाशिक महापालिका आयुक्त पदी करण्यात आली आहे.
सध्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची मुंबई मध्ये बदली झाली असून त्यांचा कारभार तुकाराम मुंडे सांभाळतील.
तुकाराम मुंडे यांच्या बदलीमागे राजकीय हस्तक्षेप असावा असे आपणास वाटते का? आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
तुकाराम मुंडे यांचा जीवनप्रवास:
ध्येयवेडा अधिकारी तूकाराम मुंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…
या मागे राजकारण आहे.