छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आणि सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले  यांनी काल भीमा-कोरेगाव वादावर बोलताना संभाजी भिडे यांची पाठराखण केली होती.

दरम्यान, उदयनराजे भोसले  यांच्या  या मुलाखतीचा आधार घेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी एका वकिलाकडून करण्यात आलेली आहे.

बारामतीमधील हेमचंद्र मोरे हे पेशाने वकील असून त्यांनी एक पत्रक काढून उदयनराजे भोसले  यांच्यावर  अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामती पोलिसांकडे केली आहे.  उदयनराजे भोसले यांनी मुलाखतीमध्ये वारंवार जातीचा उल्लेख करत दलितांविषयी आक्षेपार्ह विधानं केले असल्याचे आरोप त्यांनी ठेवले आहेत. आता याबाबत पुढे काय कारवाई होतेय हे पहावे लागेल. त्यांच्या या आरोपांवर उदयनराजे भोसले महाराज काय उत्तर देतात हे बघावे लागेल.

या व्हिडिओ मध्ये ८ मिनिट २० सेकंद पासून पुढे उदयनराजे भोसले  यांची विधाने पहावीत ..

त्याचबरोबर उदयनराजे भोसले  यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील सर्वधर्म समावेशक नीतीचा आधार देत शांतता राखण्याची विनंती केली.

उदयनराजे भोसले यांची मुलाखत:

भिडे गुरुजी यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

वडीलधाऱ्या असणाऱ्या गुरुजींचे आणि माझे कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलणे झाले, त्यावेळी बोलत असताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले. मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि तो आदर राहाणार. असेही ते म्हणाले.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी ४ जानेवारीला पत्रकाद्वारे भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराच्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये मी उपस्थित होतो व कारणीभूत आहेत, असे विधान  केलं आहे. त्यांचे हे आरोप निराधार असून शासनाने या घटनेची चौकशी व दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

©PuneriSpeaks

Source

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

More:

भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार

जातीच्या आधारावर देशाचे तुकडे तुकडे झालेले मला सहन होणार नाही : उदयनराजे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.