गुगलच्या चुकीमुळे ‘आधार’चा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये, मोबाईल हॅक होणार ही अफवा
देशभरात अॅन्ड्रॉईड मोबाईलध्ये अचानकपणे सेव्ह झालेला ‘UIDAI(आधार)’चा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचे गूगल ने मान्य केले आहे. गुगलने याबाबत स्पष्टीकरण देत माफीनामा दिला आहे. त्यामुळे ‘UIDAI’चा नंबर सेव्ह झाल्याने आपल्या मोबाईल वर सायबर हल्ला झाला आहे ही अफवा ठरली आहे.
देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये आधारचा नंबर अगोदरपासून जतन असल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ‘UIDAI’ने स्पष्टीकरण देत याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केल्याने आपोआप हा नंबर कसा जतन झाला हे कोडे राहिले होते. पण गुगलने आमच्याच चुकीमुळे हा नंबर मोबाईलमध्ये जतन झाल्याचं मान्य केलं आहे.
आधार बाबत गुगलचे स्पष्टीकरण
2014 साली ‘यूआयडीएआय आणि इतर 112 हेल्पलाईन नंबर अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये कोडिंग करण्यात आले होते, असा खुलासा गूगल ने केला आहे. हा नंबर एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. लोकांना झालेल्या त्रासामुळे गूगल ने खेद व्यक्त केला असून सर्व प्रकरणावर गुगलने माफीनामा सादर केला.
तुमचा मोबाईल हॅक झाला नाही.
‘आधार चा सेव्ह झालेला नंबर तुम्ही डिलीट करु शकता. या नंबर ने आपला मोबाईल हॅक होईल याची शक्यता गूगल ने नाकारली आहे.
‘1800 300 1947’ हा नंबर UIDAI आधार चा नंबर असल्याचं सांगितलं जात होते. परंतु हा नंबर UIDAIचा टोल फ्री नंबर नसून आधारचा हेल्पलाईन नंबर ‘1947’ आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
Ajay Devgn Chanakya: Ajay Devgan Set to Play Chanakya in Neeraj Pandey Next Film
फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो