महासत्ता अमेरिकेवर एक मोठे आर्थिक संकट कोसळले असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीच्या वेळीच सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.
सरकारला 16 फेब्रुवारीपर्यंत निधी दिला जावा अशा प्रकारचे विधेयक रात्री उशिरापर्यंत चर्चेत अडकल्याने पास न झाल्याने युनायटेड स्टेट्स मधील सरकारी कार्यालये काही काळासाठी बंद पडणार आहेत.
सरकार कडे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावे लागते. निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ आणले जाते. हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावे लागते. हे मंजूर झाल्यानंतर सरकारला निधी गोळा करण्यास वेळ मिळतो. परंतु हे विधेयक पास न झाल्याने सरकारवर बंद पडण्याची वेळ आली आहे.
स्टॉप गॅप बिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने मंजूर केले होते परंतु सिनेटर्स सदस्यांनी हे विधेयक चर्चेत गुंतवून पास न होऊन दिल्याने सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.