वडोदरा महानगरपालिकेने केली पाणीपुरी बंदी, 4000 किलो पुरी फेकून दिली

0
वडोदरा महानगरपालिकेने केली पाणीपुरी बंदी, 4000 किलो पुरी फेकून दिली

पाणीपुरी बंदी

पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी ही एक वाईट बातमी आहे. गुजरातच्या महानगरपालिकेने पाणीपुरी तयार करण्याच्या अस्वच्छ व्यवहार्य पध्दतीमुळे पाणीपुरी विक्रीसाठी तात्पुरती बंदी घातली आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पाणीपुरी बंदी चा उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. महानगरपालिकेने असे म्हटले आहे की अशा अस्वच्छ पद्घतीने पाणीपुरी बनवल्यामुळे वडोदरामध्ये विषमज्वर, कावीळ आणि अन्नपदार्थांतुन विषबाधा पसरण्यासारख्या आजाराचा प्रसार सुरू झाला आहे.


महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरी विक्रेत्यांवर अचानक धाड टाकत कारवाई केली आहे.

वडोदरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरी बनवण्याच्या हजारो किलो वस्तू जप्त करून त्या फेकून दिल्या आहेत. ज्यात खराब पीठ, शिळे तेल, सडलेले बटाटे आणि खराब पाणी यांसारख्या वस्तूंचा समावेश होता.

शहरातील महानगरपालिकेने किमान 50 पाणीपुरी उत्पादकांवर छापा घातला. महामंडळाने 4000 किलो पुरी, 3,500 किलो बटाटे आणि काबुली चना आणि 1,200 लीटर आम्लयुक्त पाणी फेकून दिले.

वडोदरा महानगरपालिकेने पावसाळा संपेपर्यंत पाणीपुरी विक्री करण्यास बंदी घातली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

Ajay Devgn Chanakya: Ajay Devgan Set to Play Chanakya in Neeraj Pandey Next Film

फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.