प्रेम दिवस: Valentine Day
इराला फोन येतो. हॉस्टेलच्या बाहेर येऊन ती थांबते. विराज गाडी घेऊन उभा ठाकतो. आणि दोघांची जोडी जाते. वातानुकुलीत मल्टीप्लेक्सची इमारत आणि आत सुरु होता पद्मावत पिच्चर. पिच्चर कोण बघत का आत? याचं तर काय हातात हात घेण. अंधारा सीन सुरु असेल तर आत कमी प्रकाश पडत आणि तो फायदा घेऊन तो तीच चुंबन घेत. अडीच तासाच्या वेळात शेकडो चुंबन घेतले त्याने तिचे.आणि प्रत्येक चुंबनाच्या स्पर्शात ती त्याची होत गेली.
पिच्चर संपला आता दोघ बाहेर आली. दोघांनी असच दिसेल तिकड गाडी पळवत रपेट मारली. आणि तिला भूक लागली. तो तिला एका हॉटेलात घेऊन गेला. तिला हव ते घेऊन दिल. मी त्यांना बघत होतो तर अस वाटत होत तो तिचा वडील आहे आणि ती त्याची मुलगी. डोळे चमकले माझे त्याचं हे प्रेम बघून. तीन ते सगळ खाल्ल त्यालाहि अधून मधून भरवत ही होती ती.
मग दोघ बाहेर पडली. आणि दुकानात गेली. आत एकाच्या हातावर गोंदण काम सुरु होत. भीतीने तिन त्याच्याकड बघितल. त्यान तिला हाताला धरून पुढ केल.
थोडावेळाने तिच्या हातावर कायमची गडद अक्षर कोरली गेली “विराज”. तिचा हात सुजला. त्यान तिला बाहेर आल्यावर चॉकलेट दिले. ती सगळ दुखण विसरून गेली. आता वाजले होते पाच. हॉस्टेलला आत यायची वेळ आठ होती अजून तीन तास बाकी होते. आणि आज स्पेशल दिवस होता. त्यामुळे तिला लवकर काय आत जायचच नव्हत. कोणाशी संपर्क नको म्हणून तीन मोबाईल पण रूम वर ठेवला होता. त्या मोबाईल वर आठ कॉल येऊन गेले होते आईचे.
दोघ एका बागेत जाऊन बसले. बागेत सगळे जोडपीच होते. लहान मुल दुसर्या बाजूला होते. कोण झुडुपाच्या आडोशाला. कोण झाडाखाली कोण झाडाला टेकून कोण कुणाच्या पुढ्यात कोण कुणाच्या मांडीवर बसलेल. अशात हि दोघ एका झाडाच्या माग उभी होती.
तिला सांगायचं होत आजचा दिवस ती कधीच विसरणार नाही पण तेवढ्यात विराजच्या तोंडून शब्द येतो, तुझ माझ्यावर प्रेम आहे का?
तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं होत, ती पटकन हो म्हणते. आणि त्याला मिठी मारायला जाते. आणि तो तिला हाताने माग ढकलत सांगतो माझ्यासोबत सेक्स कर. तरच मी तुझ्याशी बोलीन.
ती घाबरते. स्वताला सावरत ती त्याच्याकडे बघते. म्हणजे आज जे दिवसभर घडल ते फक्त या कारण साठी होत का असा विचार येतो तिला. ती नाही अस खुणावते. तो तिचा हात धरतो आणि तुला सोडतो अस म्हणत निघतो. ती रडायला लागते. तीला सोडून जायचं नसत त्याला. ती खुप विनवण्या करते त्याला. तो फक्त नकाराचा पाढा वाचतो. शेवटी पाच सहा दिवसाच्या ओळखीच प्रेम वाचवण्यासाठी ती त्याला होकार देते. आठ वाजून गेले.
हे दोघ एका लॉजवर जातात. नऊ वाजतात दोघ हॉस्टेलच्या दारात येतात. आणि ती जाताना त्याला उद्या भेटायला बोलावते. तो होकार देतो.
ती आत जाते. शिक्षकांचा ओरडा खाते. रूम मधल्या मुलीना बॉय-फ्रेंड नसतो म्हणून इराच सगळ्या लक्ष देऊन ऐकत असतात. इरा सगळ सगळ त्यांना सांगते. आणि झोपताना त्याला मेसेज करते. आणि डोळ्यातल्या पाण्याला संयम राहत नाही. त्यान तिला ब्लॉक केलेलं असत. आणि तिला एक गोष्ट आठवते पण तिन ती दुर्लक्ष केलेली असते.
तो तिच्या सोबत खात नाही. कारण तो आधी बाहेरू खाऊन आलेला असतो. ती त्याच नाव गोंदते पण तो तीच नाव गोंदुण घेत नाही. आणि त्या बेड वर दोघ अर्धनग्न अवस्थेत असताना तिला त्याच्या दंडावर गोंदलेल नाव दिसलं जे तीच नव्हत.
आज खास दिवस होता १४ फेब्रुवारी. आणि त्यान तो दिवस जगून घेतला. आणि तिन हि कसला विचार न करता तो दिवस त्याला जगायला प्रोत्साहन दिल…
हेच आहे का प्रेम तरुणांनो. आज भेट उद्या कॉल परवा कीस आणि तेरवा सेक्स?
३६५ दिवसातला हाच एक दिवस आहे का प्रेम करायला आणि प्रेम मोडायला?
प्रेम कराव पण मनाशी, शरीराशी नाही.
प्रेम दिवसाच्या खूपखूप शुभेच्छा. जे अजून प्रेम करत नाही त्यांना.
जे करतात त्यांना याची गरज नाही अस मला वाटत.
लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426
©PuneriSpeaks
कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं