वाटणी
दोन सख्खे भाऊ
पक्के वैरी झाले
बघता बघता ते आता
वाटणी वर आले
बारा खणाचा वाडा
६-६खणांची वाटणी केली
दोघांच्या मध्ये एक
भावकीची भिंत आली
घराची एकही वीट
विधवा आईच्या वाट्याला नाही आली
त्यांनी १२ खणासमोरच
तीच्यासाठी झोपडी तयार केली
भांडीकुंडी जमिनजुमल्याची
झाली समान वाटणी
विषय राहीला फक्त
विधवा आईला कोण देणार
भाकर आणि चटणी
८-८दिवसांनी द्यायची
ठरले एक-एकाने
आईसाठी भाकरी
पण भाकरीच्या बदल्यात तीने
करायची त्याच्याच घरी चाकरी
दिवाळी सणासाठीही तीला
कोणी नवी साडी नाही दिली
मग तिनेच दोन लुगड्यांची
नवी चिंधी तयार केली
भाकरतुकड्या वाचून आईचे
होऊ लागले हाल
दोघेही म्हणतात “आमचा
आठवडा संपलाय काल”
शेवटी एकाने दिले मीठ
एकाने दिले पीठ
आईला अशा
भिका-यावाणी जगण्याचा
आला आता खूप वीट
बिचारी आई अन्नाविना
तशीच झोपी गेली
दोन दोन वंशाचे दिवे
पण कोणालाच तीची
दया नाही आली
झोपेतच मारली तीने
मग मरणाला मिठी
मरणानंतरही जुंपले भांडण मयतीच्या खर्चासाठी
शेवटी गावक-यांनी तीला
अग्नीडाव दिला
दोन वंशाचे दिवे पण
शेवटीही एक कामी नाही आला
असे जगता जगता
नातूही झाले मोठे
त्यांनाही प्रश्न पडला
आईबापाला ठेवावे कोठे?
त्यांनीही आईबापाला
आजीच्याच झोपडीत ठेवले
केलेल्या पापाचे फळ
त्यांना याच जन्मी दिले
जैसी करणी वैसी भरणी
ही रितच खरी आहे
थोडा धीर धर मित्रा
घोडामैदान जवळच आहे.
“कर्म” एक असं बुफे रेस्टॉरेंट आहे
जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही…
तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण
शिजवलेलं असतं.
कविता कोणी लिहिली माहीत नाही परंतु ज्याने लिहिली आहे त्याला सलाम…
©PuneriSpeaks
For more VISIT