विजय दिवस : १९७१ च्या युद्धात ९३ हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस.!

0
विजय दिवस : १९७१ च्या युद्धात ९३ हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस.!

युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना भारतीयांकडून श्रद्धांजली.!

भारत आणि पाकिस्तान दरम्यान लाडल्या गेलेल्या या लढलेल्या दुस-या युद्धात पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर गुडघे
टेकत शरणागती पत्करली होती.या विजयाला आज ४६ पुर्ण होत आहेत.

१६ डिसेंबर १९७१ च्या या दिवशी युद्धात ९३ हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा ऐतिहासिक विजय दिवस.!
भारतीय सैनिकांच्या या पराक्रम आणि बलिदानामुळे देशाला ऐतिहासिक विजय मिळाला. म्हणूनच विजयदिवस करत असताना भारतीय सैनिकांच्या या पराक्रम आणि बलिदानास सलाम करत हा विजय दिवस साजरा करतात.

या युद्धातूनच बांगलादेश देशाची निर्मिती..

पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारामुळे त्यावेळी बांगलादेशमधून साधारण १ कोटीच्या आसपास लोक भारताकडे आले होते. हे अत्याचार चालूच राहत असते तर भारतात असंतोष वाढत जाईल म्हणून त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाचा निर्णय घेतला. हे भारत-पाकिस्तानमधील छोटे युध्द ठरले. ३ डिसेंबर  रोजी युद्धाला सुरवात झाली आणि फक्त १३ दिवसांमध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. १६ डिसेंबर १९७१ च्या या दिवशी युद्धात ९३ हजार पाक सैनिक शरण आले. हाच १६ डिसेंबर  १९७१ भारताचा ‘विजय दिवस’ ठरला.

या १९७१ च्या युद्धात भारताच्या ४ हजार सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आहे. तर १० हजार सैनिक जखमी झाले होते. शहीदांच्या  या पराक्रमाला आणि बलिदानाला सलाम करत दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला सलामी देत युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. तसेच देशभर  ‘विजय दिवस’ साजरा केला जातो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजय दिनानिमित्त शहीदांची आठवण करत श्रद्धांजली अर्पण केली.

भारताचे संरक्षणमंत्री व्ही.के.सिंग यांनी ट्विट करून १९७१ च्या शहीद झालेल्यांना श्रद्धांजली दिली.

How to Join NDA (National Defence Academy)?-In Marathi

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.